कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केस कापणे महागणार *उद्या सोमवार दि.१ जून पासून नवीन दर लागू करणारकेस कापणे १००रु, दाढीसाठी ६० रू
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केस कापणे महागणार
*उद्या सोमवार दि.१ जून पासून नवीन दर लागू करणार
केस कापणे १००रु, दाढीसाठी
६० रू
बीड प्रतिनिधी : सलून दुकानात येणाऱ्या ग्राहकांना कोरोनाची बाधा होऊ नये , यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शासनाने केल्या आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे . त्यामुळे उद्या १ जूनपासून राज्यासह बीड जिल्ह्यात केस कापण्याच्या व दाढीच्या दरात वाढ केली जाणार असल्याची माहिती
वीर जिवा महाले प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र नाभिक आरक्षण समिती प्रदेश कार्याध्यक्ष किशोर गाडेकर आणि नाभीक दुकान मालक संघटनेचे बीड शहराध्यक्ष सुनिल दोडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन दिली.
या पत्रकात किशोर गाडेकर, आणि सुनील दोडके पुढे म्हणतात की, राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकाला कोरोनाची बाधा होऊ नये, सलूनमधील कारागिराला बाधा होऊ नये , यासाठी सलूनमध्ये वापरले जाणारे सर्व साहित्य निर्जंतुकीकरण करून वापरावे लागणार आहेत. तसेच ग्राहकाला सलुन मध्ये आल्यावर हात हॅन्डवॉशने स्वच्छ करावे लागणार आहेत. या साठी सॅनिटायझरचा वापर केला जाणार आहे . दाढी करताना प्रत्येक ग्राहकाला नवीन नॅपकीन , केस कापताना प्रत्येक वेळी वेगळी चादर वापरली जाणार आहे. या सर्व सुविधा द्यायच्या असल्याने नाभिक समाज बांधवांचा मोठा खर्च होणार आहे. लॅक डाऊन मुळे बांधवाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. अशा परिस्थितीत आहे त्याच दरामध्ये ग्राहकाला सेवा देणे नाभिक समाज बांधवांना शक्य होणार नाही. शिवाय वाढती महागाई या सर्व बाबींचा विचार करता केस कापणे आणि दाढी करणे यांच्या दरात वाढ करणे अपरिहार्य आहे. एकंदरीतच कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर महागाई, आणि सुरक्षितेसाठी होणारा खर्च याचा सारासार विचार करून राज्यासह बीड जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज बांधवांनी दर वाढिचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ग्राहकांना केस कापण्यासाठी १०० रुपये , दाढी करण्यासाठी ५० तर स्पेशल दाढी करण्यासाठी ६० रुपये या प्रमाणे दर आकारले जातील. सदरील दरवाढ ही उद्या सोमवार दि.१ जून पासून लागू करण्यात ह
येणार आहे.
____________________
सलुन मध्ये असणार सुरक्षा साधने!
केस कापणाऱ्या कारागिरांनीही सुरक्षेची साधने वापरणे आवश्यक आहे. यामध्ये स्वत : साठी मास्क , हँडग्लोज , चेहऱ्यासाठी ग्लास कॅप , ड्रेसकोड वापरावा लागणार आहे .
________________________
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांना ही घ्यावी लागणार काळजी!
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर आता सलूनमध्ये जाणार्या ग्राहकांनाही काळजी घ्यावी लागणार आहे. शासन निर्णयानुसार सलून मध्ये येताना प्रत्येक ग्राहकाला दाढी साठी स्वतःचा टाॅवेल आणि केस कापण्यासाठी स्वतः चा कापडा आणावा लागणार आहे. त्यामुळे उद्यापासून दाढी आणि केस कापण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांनी स्वतःचा टाॅवेल आणि कपडा आणावा.
_________________________
फेसवॉशचा आग्रह धरू नये!
कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेची काळजी घेऊन ग्राहकांना सेवा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यामध्ये सर्व सुविधा देत असताना फेश वॉश ची सुविधा देता येणार नाही. त्यामुळे या आजाराचा गांभीर्याने विचार करता ग्राहकांनी कोणत्याही नाभीक समाज बांधवाकडे फेश वॉश चा आग्रह धरू नये.
__________________________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा