हाजी शेख ज़ुबेर यांना विश्व मानवाधिकार परिषदकडून कोरोना वॉरियर्स पुरस्कार प्रदान
हाजी शेख ज़ुबेर यांना विश्व मानवाधिकार परिषदकडून कोरोना वॉरियर्स पुरस्कार प्रदान
बीड (प्रतिनिधी) - शहरातील सामाजिक कार्यकर्ते हाजी शेख ज़ुबेर ईसाक़ हे गेल्या दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून लॉक डाऊन च्या काळात सर्वसामान्य, गोरगरीब, हात मजुरांना सढळ हस्ते करत असलेल्या अन्नधान्य व किराणा सामान वाटपाच्या मदत कार्याची नोंद घेऊन लखनऊ येथील विश्व मानवाधिकार परिषद वर्ल्ड ह्यूमन राइट्स कौन्सिल ने त्यांना कोरोना वॉरियर्स पुरस्कार देऊन सन्मानित केले.
कोरोना महामारीमुळे चारचौघात जाऊन मिसळणे, वावरणे म्हणजे फार जोखमीचे झाले आहे. परंतु महामारी ला घाबरून प्रत्येक जण आपापल्या घरीच बसून राहिला तर सर्वसामान्य, गोरगरीब, हातमजूरांच्या पोटाचे व जीवनाचे काय ? या प्रश्नाकडे लक्ष देऊन शहरातील सहृदयी सामाजिक कार्यकर्ते हाजी शेख ज़ुबेर इसाक़ यांनी स्वतः सह आपल्या जीवाभावाच्या तरुणांना एकत्रित करून अन्नधान्य आणि किराणा सामान वाटप करण्याचे कार्य हाती घेतले आहे. विशेष म्हणजे दानधर्म करताना फक्त मुस्लिम धर्मियांनाच नाही तर सर्व जाती धर्मातील गरजूवंतांना त्यांनी आतापर्यंत जीवनावश्यक अन्नधान्य व किराणा सामान वाटप केले आहे आणि करत आहेत. त्यांनी आतापर्यंत शहरातील वडार वस्ती, इमामपूर रोड, रामतीर्थ, आयोध्या नगर, एमआयडीसी एरिया, लक्ष्मण नगर, शहिंशाह नगर, आसेफ नगर या भागातील सर्वसामान्य गोरगरीब व हातमजूर असलेल्या हजारो नागरिकांसाठी लाखो रुपये खर्च करून जीवनावश्यक अन्नधान्य आणि किराणा साहित्याचे वाटप केले आहे. सध्याही त्यांचे हे कार्य दिवस उजाडल्यापासून ते संध्याकाळ होईपर्यंत युद्धपातळीवर सुरूच आहे. कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले लॉक डाऊन लक्षात घेता समाजातील सधन, धनिक व श्रीमंत लोकांनी गोरगरिबांसाठी स्वतःहून पुढे येत मदतीचा हात दिला पाहिजे. असे आवाहनही ते करीत असतात. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी पासून त्यांनी सुरु केलेल्या या मोहिमेत आतापर्यंत बीडचे तहसीलदार आंबेकर, पोलीस निरीक्षक बिर्ला आणि ते ज्या-ज्या प्रभागात जाऊन जीवनावश्यक वस्तू वाटप करतात त्या-त्या प्रभागातील नगरसेवक जातीने उपस्थित होते. त्यांनी पुढे येऊन आपण समाजात जन्मलो तर समाजाचे काही देणे लागतो, हा विचार करून सुरू केलेल्या या दान मोहिमेची नोंद घेत लखनऊ येथील विश्व मानवाधिकार परिषदेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम.आर. अन्सारी, राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा मुख्य सल्लागार हाजी आय.ए.एस.जमा, राष्ट्रीय मुख्य सचिव प्रसून गोस्वामी आणि महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष हाजी सय्यद लायक़ यांनी हाजी शेख ज़ुबेर ईसाक़ यांना कोरोना वॉरियर्स हा पुरस्कार देऊन सन्मानीत केले. त्यांना हा सन्मान मिळाल्याने ते राहत असलेल्या आसेफ नगर भागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या हस्ते गोरगरिबांसाठी अशा प्रकारचे कार्य सततपणे होत राहो, अशा सदिच्छा ही व्यक्त केल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा