बीड शहरासह बारा गावातील संपुर्ण संचार बंदी हटवली
बीड शहरासह बारा गावातील संपुर्ण संचार बंदी हटवली
बीड: जिल्हाधिकारी बीड यांनी संपूर्ण बीड शहरात लागू केलेली संचारबंदी रात्री 2 वाजता हटवली. तसे आदेश त्यांनी जारी केले आहेत. त्यामुळे सकाळी 7:30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कारेगाव ता. पाटोदा येथील रुग्णाच्या संपर्कात आलेले प्रत्यक्ष नागरिकांचे स्वब आज निगेटिव्ह आढळून आले. त्यामुळे शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
बीड शहरातील या भागात संचारबंदी
१. मोमीनपुरा-अशोकनगर, जयभवानीनगर,सावतामाळी चौक, संभाजीनगर बालेपीर येथील परिसरात प्रतिबंधात्मक आदेश कायम ठेवणे ठेवण्यात येत आहे.
२. या कार्यालयाचे दिनांक २८/०५/२०२० रोजीचे किराणा सेवा घरपोच पुरविणे, बँका बाबत व अत्यावश्यक सेवेबाबत काढलेले ( फिरते दुध विक्रेते, जार वाटर सप्लायर्स इ. बाबतचे) तीनही आदेश रदद करण्यात येत आहेत.
३. यापूर्वी या कार्यालयाने दिनांक २५/०५/२०२० रोजी काढलेले आदेश पूर्ववत करण्यात येत आहेत. ज्याद्वारे जिल्हयातील सर्व भागांना (Conatinament व परवानगी देण्यात आलेली होती. Buffer Zone वगळून) सकाळी ७.३० ते सध्यांकाळी ६.३० पर्यंत
या गावातील संचारबंदी उठवली
बीड तालुक्यातील खंडाळा ,
च-हाटा , पालवण व इट , पाटोदा तालुक्यातील वैजाळा व डोंगरकिन्ही , वडवणी तालुक्यातील देवडी , गेवराई वालुक्यातील खांडवी , मादळमोही व धारवंटा , केज तालुक्यातील खरमाटा व धारुर तालुक्यातील पारगांव येथील प्रतिबंधात्मक आदेश शिधील करण्याल आले आहेत.
छान दिलासा देणारी बातमी .
उत्तर द्याहटवा