जिल्ह्यात हेअर सलून,स्पा व ब्यूटी पार्लर २८ जून पासून सुरु करण्यास अटी व शर्तीच्या आधारे परवानगी--जिल्हाधिकारी राहुल रेखावार*


बीड,  दि. २६:- जिल्ह्यात हेअर सलून,स्पा व ब्यूटी पार्लर २८ जून २०२० रोजी पासून सुरु करण्याबाबत अटी व शर्तीच्या आधारे परवानगी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

      हेअर सलून,स्पा व ब्यूटी पार्लर चालू करणे संदर्भात निर्देशानुसार अटी पुढील प्रमाणे आहेत.

१. हेअर कट, केसांना रंग लावणे, व्हॅक्सींग,थेड्रींग इत्यादी सारख्या सेवांना परवानगी देण्यात आली असून त्वचेविषयीच्या सर्व सेवांना परवानगी नाही. याबाबत संबंधित दुकानदार यांनी दुकानाबाहेर दर्शनी भागावर फलक लावावा.

२. हेअर सलून, स्पा, ब्यूटी पार्लर आदी  दुकानात काम करणाऱ्या व्यक्ती व कर्मचारी यांनी मास्क, ग्लोव्हाँज,अप्रॉन इत्यादी  परिधान करुनच सेवा देणे बंधनकारक असेल.

३. हेअर सलून, स्पा, व्यूटी पार्लर दुकानदार यांनी प्रत्येक ग्राहकाला सेवा दिल्यानंतर त्या ग्राहकाची खुर्ची सॅनीटाईज करुन घ्यावी. तसेच दर दोन तासाला पूर्ण दुकान सॅनीटाईज करुन घ्यावे.

४. हेअर सलून/स्पा/ब्यूटी पार्लर दुकानदार यांनी एकदाच वापर करण्यायोग्य (Disposable ) टॉवेल, नॅपकीन इत्यादीचा वापर करावा. वांरवार वापर कराव्या लागणाऱ्या साधनांचे प्रत्येक ग्राहकांच्या सेवेनंतर सॅनीटाईज किंवा निर्जतुकीकरण करावे.

५. हेअर सलून/स्पा/ब्यूटी पार्लर इ. यांनी सदरील निर्देशांचे अनुपालन करणे संदर्भाने सर्व ग्राहकांना सूचना द्याव्यात.

तसेच सर्व निर्देशांचा फलक ग्राहकांच्या माहितीसाठी दर्शनी भागावर लावावा अशा सूचना या आदेशानुसार देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात दिनांक ३० जून २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहे. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहतील.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन