विप्रनगरचा काही भाग सील तर आजचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह ! बीडकरांना दिलासा ...
बीड प्रतिनिधी - शहरातील बामनवाडी , विप्रनगर भागातील एक महिला औरंगाबाद येथे कोरोना बाधित आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने शनिवारी या भागात फवारणी करत पाहणी केली , दुपारी जिल्हाधिकारी यांनी हा भाग कॅन्टोन्मेंट जाहीर केला .दरम्यान आज पाठवलेले सर्वच्या सर्व स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत .
शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या बामनवाडी भागातील एका कुटुंबातील महिलेला न्यूमोनिया चा त्रास होऊ लागल्याने सुरवातीला शिवकमल हॉस्पिटलमध्ये आणि नंतर औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले .त्यानंतर आरोग्य विभागाचे अधिकारी डॉ नरेश कासट यांनी स्वतः या भागाची नगरसेवक अमर नाईकवाडे यांच्यासह पाहणी करत या भागात फवारणी करून घेतली .
दरम्यान दुपारी जिल्हाधिकारी यांनी विप्रनगर भागातील श्रीकिशन जेथलिया यांच्या घरापासून माऊली मुंडे यांच्या घरापर्यंतचा भाग कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे . दरम्यान शनिवारी पाठवलेल्या 24 पैकी 24 स्वब रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने बीडकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे .
*कोविड 19-बीड अपडेट - 27/जून/२०२०*
*आज पाठविलेले स्वॅब - 24*
*निगेटिव्ह अहवाल - 24*
*पॉजिटिव्ह अहवाल - 00*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा