* सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी* बीड, दि. २२::--जिल्ह्यातील बीड, माजलगांव, परळी , अंबाजोगाई , केज व आष्टी या शहरांमधील सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट यांना व इतर सर्व प्रकारच्या दुकानांना 23 आॅगस्ट 2020 पासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविण कुमार धरमकर यांनी दिले आहेत. तसेच सर्वांनी कोवीड-19 विषयक सर्व खबरदारी पाळूनच कामकाज करावे. तसेच कन्टेनमेंट झोन मधील परिसरातील निर्बध तसेच कायम राहतील. यापूर्वी बीड, माजलगांव, परळी, अंबाजोगाई, केज व आष्टी या शहरांमध्ये २१ आॅगस्ट २०२० रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन लागू करण्यात आले होते. सुशोभिकरणाचे साहीत्य विक्री करणारे दुकाने, मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट, व इतर सर्व प्रकारच्या सर्व दुकानांना उघडण्याच्या परवानगीबाबत लाॅकडाऊन नंतर स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येईल असे नमूद केले असल्याने हे स्वतंत्र आदेश दिले आहेत राज्य ...
जयभवानीने दिले व्हेंटिलेटर ! गेवराई (प्रतिनिधी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा आरोग्य यंत्रणेला जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने तीन व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी व्हेंटिलेटर स्वीकारले. आपत्तीच्या प्रसंगात नेहमीच अमरसिंह पंडित आणि शिवछत्र परिवार सर्वसामान्य जनतेच्या मदतीला धावून येतात, महापूर असेल किंवा इतर कोणत्याही संकटात त्यांच्याकडून सदैव मोठी मदत होते. कोरोनाच्या संकटात सुध्दा त्यांनी यापूर्वी पाच हजार गरजू कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. जय भवानी आणि जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाच्या शिक्षक व इतर कर्मचारी यांनी सामाजिक बांधिलकी जपत अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा आरोग्य विभागाला तीन व्हेंटिलेटर देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन व्हेंटिलेटर उपजिल्हा रुग्णालय, गेवराई येथे मंगळवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी संस्थेचे अध्यक्ष अमरसिंह पंडित व कर्मचारी प्रतिनिधी ...
इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन मुंबई- बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांचं वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झालं. मंगळवारी कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. यादरम्यान त्यांच्या आरोग्याविषयीच्या अनेक अफवा पसरत होत्या. मात्र इरफान यांच्या टीमने ते लढवय्ये असून लवकर बरे होतील अशी आशा व्यक्त केली होती. मात्र बुधवारी दिग्दर्शक शूजित सरकारने इरफान यांच्या निधनाचं ट्वीट करत खान कुटुंबियांचं सांत्वन केलं. शूजीत यांनी ट्वीटमध्ये लिहिले की, 'इरफान माझ्या मित्रा.. तू लढलास आणि लढलास आणि लढलास.. मला तुझा नेहमीच अभिमान वाटेल. आपण पुन्हा भेटू. सुतापा आणि बाबिल तुम्हीही लढलात. सुतापा या लढाईत तुला जे शक्य होतं ते तू केलंस. ओम शांती. इरफान खानला सलाम.' दोन दिवसांपूर्वी त्यांची आई सईदा बेगम यांचं निधन झालं. लॉकडाउनमुळे इरफान यांना आईला शेवटचं पाहता आलं नाही. आईचं अंत्यदर्शनही त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे घ्यावं लागलं होतं. आईला पाहता न आल्याचं दुःख त्यांच्या मनात होतं. गेल्या काही वर्षांपासून इरफान आजा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा