आज तब्बल 27 जण पॉझिटिव्ह!

बीड  (प्रतिनिधी): जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा मोठा संसर्ग होत आहे.  कोरोना विषाणुच्या वाढत्या संसर्गाच्या  कहराने नागरिक त्रस्त झाले आहेत. तर दुसरीकडे या कोरोना कहराचा प्रभाव कमी करता करता  प्रशासनाच्या नाकी नऊ आले आहेत. कोरोना संक्रमणाची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेता येणाऱ्या काळात बीड जिल्ह्यावरील मोठ्या संकटाचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या परिस्थितिमध्ये रात्री उशीरा येणारे रिपोर्ट आणखी चिंता वाढवत आहेत.
 आज बीड जिल्ह्यामध्ये एकूण “27” पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या पैकी  बीड शहरात 7 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी
घाबरू न जाता  काळजी घेऊन वावरले पाहिजे. 
मास्क वापरा…सोशल डिस्टेन्स ठेवा… प्रशासनाच्या सुचनेचं पालन करा.. सुरक्षित रहा...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन