बीड जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच;आज 50 रुग्ण पॉझिटिव्ह!
बीड जिल्ह्यात कोरोनाचे धक्के सुरूच;आज 50 रुग्ण पॉझिटिव्ह!
बीड प्रतिनिधी: रोज रात्री येणाऱ्या धक्कादायक रिपोर्टने बीड प्रशासन,नागरिक हवालदिल झाले आहेत. दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीमुळे बीड जिल्ह्यातील प्रशासनासह नागरिकांत चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. सध्या या वाढत्या रूगणांमुळे जिल्ह्याची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणांमुळे मुक्त संचार करणे कठीण झाले आहे. नागरिकांच्या हाताला काम नसल्यामुळे सर्व सामन्यांना रोज आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहेत. अशा भयाण परिस्थितीमध्ये आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज बीड जिल्ह्यात एकूण 50 पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा