बीड शहरात शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू वडील, मुलगी अन काका चा दुर्दैवी अंत

 
बीड (प्रतिनिधी) : घरावर जाण्यासाठी असणा-या लोखंडी सीडीमध्ये विद्यूत प्रवाह उतरल्याने एक सात वर्षीय चिमुकलीला करंट बसला. तिला वाचवण्यसाठी गेलेल्या बापासह चुलत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बीड शहरातील गोविंदनगर भागात सोमवारी ( दि .13 ) सकाळी ११वाजण्याच्या सुमारास घडली. श्रेया वडमारे तुळशीराम वडमारे ( वय 7 ) , तुळशीराम बापुजी वडमारे , बाळू उर्फ रमेश बापूजी वडमारे अशी मयतांची नावे आहेत .
 श्रेया ही लोखंडी सीडीवर जात होती. या सीडीमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने तिला करंट बसला. हे निदर्शनास येताच बाजुला असलेले वडील तुळशीराम व चुलते बाळु उर्फ रमेश  यांनी वाचविण्यासाठी तिच्याकडे धाव घेतली. यावेळी तिघेही चिटकले, यामध्ये तिघांचा मृत्यु झाला. सदरील मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहे . दरम्यान या घटनेमुळे वडमारे परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला आहे . घटनास्थळी महावितरण कर्मचाऱ्यांनी  धाव घेत विद्युत पुरवठा बंद केला. या घटनेनी शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन