आज ५ पॉझिटिव्ह... परळी शहरात चार तर बीडमध्ये एक कोरोनाचा रुग्ण आढळला


बीड - कोरोना संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे परळी शहरातील चार महिलांना कोरोणाची बाधा झाली आहे . तर बीड शहरात एक रुग्ण सापडला आहे . 
परळी शहरात एसबीआय बँक कर्मचारी संक्रमित झाल्यानंतर रुग्णसंख्या मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे . 296 संशयित रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल अद्याप प्राप्त झालेले नसले तरी पाच जणांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत . यामध्ये चार रुग्ण परळी शहरात सापडले आहेत . तर एक रुग्ण बीड शहरात सापडला आहे . परळी शहरातील आझाद नगर भागामध्ये कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे अठरा वर्षाच्या दोन मुलींना , वीस वर्षीय महिलेस तसेच तीस वर्षीय महिलेस कोरोनाची बाधा झाली आहे. बीड शहरातील त्रिमूर्ती कॉलनी नंबर 3 , दत्तनगर भागात गुजरातहून आलेल्या 54 वर्षे पुरुष कोरोना बाधित आढळल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. एकूणच जिल्ह्यात आता नागरिकांनी काळजीपूर्वक राहणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे उर्वरित प्रलंबित असलेल्या अहवालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन