बकरी ईद सण शांततेत साजरा करावा, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन*

*बकरी ईद सण शांततेत साजरा करावा, कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे आवाहन*

*बकरी ईद सण जनावरांची कत्तल,  कुर्बानीच्या पूर्व परवानगीसाठी पशुधन विकास अधिकारी हे सक्षम अधिकारी*

बीड, दि. २४::-जिल्ह्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी बकरी ईद सण शांततेत साजरा करावा व कायद्याचे कोठेही उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन श्री राहुल रेखावार, जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.

शासनाने कोरोना संसर्ग (covid-19) मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय शासनस्तरावर घेण्यात आलेला आहे. 

 नागरिकांनी प्रतीकात्मक कुर्बानी करावी व बकरीईद च्या निमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये सध्या कायम करण्यात आलेले निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईद निमित्त कोणतीही शिथीलता देण्यात आली नाही. 

कोरोना  या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन व आरोग्य पर्यावरण वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे . 

 या सणानिमित्त सण सुरू होण्याच्या कालावधीत शासनाच्या वतीने वेळोवेळी देण्यात येणाऱ्या नवीन सूचनांची आणि  महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत असून या तरतुदींची पुढीलप्रमाणे आहेत 

1. गाय किंवा वाळू किंवा बैलांची कत्तल करण्यास सक्त मनाई आहे.

2. कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल यांची वाहतूक करण्यात प्रतिबंध आहे.

3. कत्तल करण्यासाठी गाय, वळू किंवा बैल यांची निर्यात करण्यास प्रतिबंध आहे.

4. गाय वळू किंवा बैल यांची अन्य कोणत्याही पद्धतीने विक्री करण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. गाय, वळू, बैल यांचे मास बाळगता येणार नाही.

5. अनुत्पादक म्हशी आणि म्हशीची पारडे या प्राण्यांची सक्षम पशुवैद्य का मार्फत कत्तल पूर्व तपासणी न करता कत्तल करण्यास मनाई आहे.

6. वाहतूक अधिनियम 1978 मधील नियम 47 अन्वये वाहतूक होणाऱ्या जनावरांची वाहतूक की पूर्वी नदीच्या पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 यांचेकडून स्वस्त तपासणी प्रमाणपत्र घेण्यात यावे.

7. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय /जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय यांचे वाहतूक प्रमाणपत्र घेण्यात यावी.

8. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांचे नियोजित तात्पुरत्या कत्तलखान्या साठी जागा पशुसंवर्धन विभागात दाखवावी. तात्पुरते कत्तलखाना मंजुरीनंतर पशुधन विकास अधिकारी सक्षम अधिकारी नियुक्ती केल्यानंतर सक्षम अधिकाऱ्याकडून कत्तलीस योग्य जनावरांचे स्वास्थ प्रमाणपत्र घेतल्यानंतरच कत्तलीस परवानगी देण्यात येईल.

कत्तल प्राप्त जनावरांची कत्तल घरी करण्यास सक्त मनाई आहे. मान्यताप्राप्त कत्तल खान्याच्या ठिकाणी किंवा तात्पुरत्या कत्तलखान्याच्या ठिकाणीच परवानगी देण्यात येणार आहे 
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन