आज नवीन ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले; परळीत ५ , बीड ३ , गेवराई २ केज १
बीड प्रतिनिधी:
बीड जिल्ह्यात कोरोना चे मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सध्या दिसून येत आहे . प्रत्येक दिवशी रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असलेल्या चिंतेत भर पडत आहे . आज ११ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. यामध्ये बीडमध्ये ३ गेवराईत 2 केज मध्ये १ तर परळीत ५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने रात्री १२:०७ वाजता दिली. या ११ पैकी १० रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झाले आहे .
बीड -3 संत नामदेव नगर माऊली कॉलनी येथील 57 वर्षीय युवक व 52 वर्षीय महिला तसेच खाजगी रुग्णालयातील कर्मचारी असलेला 19 वर्षीय युवक पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कामुळे बाधित झाला आहे.
गेवराई -2 वीर लहुजी नगर येथील 27 वर्षीय पुरुष खाजगी रुग्णालयातील कर्मचारी आहे. तसेच केकत पांगरी येथील ६० वर्षीय व्यक्ती खाजगी रुग्णालयामुळेच बाधित झाला आहे .
केज -१ तालुक्यातील होळ येथे ५५ वर्षे व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे .
परळी -५ जुने रेल्वे स्टेशन भागात १५ वर्षीय मुलगा ३५ वर्षीय पुरुष व ३५ वर्षीय महिला तसेच सर्वेश्वर नगर मधील १८ वर्षीय मुलगा व २५ वर्षीय महिला कोरूना रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झाले आहेत . त्यामुळे आता सक्रिय रुग्णांची संख्या १५८ वर जाऊन पोहोचली आहे . येणाऱ्या काळात जनतेने आणखी सजग होऊन शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा