*पॉवरफुल मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या 'सामाजिक न्याय मंत्रिपदाचे वलय' हे जनतेच्या विकासासाठी*

*पॉवरफुल मंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या 'सामाजिक न्याय मंत्रिपदाचे वलय' हे जनतेच्या विकासासाठी*


आज ना. धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनावर लिहिलेला हा लेख..


लोकनेते स्व.गोपीनाथराव मुंडे यांना ज्या पंडित अण्णांनी घडविले अशा पंडित अण्णांच्या पोटी जन्मलेले आणि स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या मुशीत घडलेले नेतृत्व म्हणून ना. धनंजय मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. राजसकुमार राजबिंड व्यक्तीमत्व असलेल्या धनंजय मुंडे यांच्याठायी स्व. प्रमोद महाजन यांच्या सारखी वक्तृत्व शैली, मधुर अन् आपलेपणाची वाणी आणि संवाद कौशल्य तर काका स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे राजकीय कसब, पिता स्व. पंडित अण्णा मुंडेंचा धाडसीपणा ठासून भरलेला आहे. त्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश‌ केला त्या दिवसा पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवारांचा मुरब्बीपणा, आणि अजित पवारांची प्रशासकीय असणारी पकड ना. धनंजय मुंडे यांच्या ठायी असलेली जाणवत आहे. या शिवाय अतिउच्च बुद्धिमत्ता, प्रचंड आत्मविश्वास, खंबीर निर्णय घेतल्याची क्षमता आणि मेहनत करण्याची तयारी आदी गुणांचा मिलाफ ना. मुंडे यांच्या
अंगी असल्याचे दिसून येत आहे. एकंदरीतच सर्वांना भुरळ पडावी असं धनंजय मुंडे नावाचे  एक अजब रसायन स्वंयसिद्ध झाले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे हे मागील काही वर्षांपासून
महाराष्ट्राच्या राजकारणात पाॅवर  फुल राजकारणी म्हणुन ओळखले जात आहेत. या अजब रसायनाचा म्हणजे धनंजय मुंडे यांच्या सद्गुणांचा राष्ट्रवादी पक्षासाठी फायदा करुन घेण्यासाठी खा. शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात धनंजय मुंडे यांच्याकडे विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपदाची महत्वाची जबाबदारी सोपविली. धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात चार वर्ष सक्षमपणे सरकारच्या चुकीच्या धोरणावर परखडपणे निर्भिड आणि निष्पक्षपणे सडकून टीका करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाला न्याय दिला. या विरोधी पक्षाच्या माध्यमातून गोर गरीब दीन दलित अन्यायग्रस्त पीडितांना माता भगिनींना न्याय दिला. विधान परिषदेचा 'विरोधी पक्षनेतापद' या मिळालेल्या जबाबदारीला धनंजय मुंडे यांनी संधी म्हणून बघितले आणि या संधीचे सोने केले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून मिळालेल्या चार वर्षाच्या कालावधीत धनंजय मुंडे यांनी राज्यभर दौरा करून 
संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला. राज्यातील मोठ्या प्रमाणात 
मतदारांशी थेट संपर्क निर्माण 
केला.
धनंजय मुंडे यांनी आपल्या
दौ-यात युवक-युवती, वडिलधारी मंडळी, माता-भगिनी मतदारांशी एक नाळ जोडली. त्याच बरोबर शेतकरी, शेतमजूर, दीनदलित, गोरगरीब जनतेचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न समजुन घेतले. या प्रश्नावर  विधीमंडळात तर कधी विधीमंडळाच्या बाहेर आवाज उठवला. त्यांच्या प्रामाणिक कामामुळे मराठवाडय़ासह राज्यात  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी मिळाली. धनंजय मुंडे यांच्या कामाचा आवेग आणि आवाका पाहता  पक्षाच्या प्रमुख कार्यकारणीत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील  तटकरे, जयंत पाटील, छगन भूजबळ आदी नेत्यांच्या बरोबरीचे स्थान मिळविले. त्यामुळे तरूण वयात एक अनुभवी दिग्गज नेता अशी ना. धनंजय मुंडे यांची ओळख निर्माण झाली. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता म्हणून ना. धनंजय मुंडे यांनी आपल्या कार्यामध्ये मोठा बदल केला. 'हल्लाबोल याञा, संघर्ष यात्रा आणि निवडणुकीच्या पूर्वी काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून संपुर्ण महाराष्ट्रात दौरा करत असतांना  त्यांच्या सभेला विशेषतः त्यांच्या  भाषणाला तरुणांचा मोठा  प्रतिसाद मिळाला. तरूणांचा मिळणारा प्रतिसाद पाहता धनंजय मुंडे हे 'तरुणांचे नेते' अशी ओळख निर्माण झाली. एवढच नाही तर ते  तरुणांच्या गळ्यातील 'ताईत' बनले. आजच्या परिस्थितीत विविध राजकीय पक्षातील तरुण कार्यकर्त्यांचे धनंजय मुंडे हे 'आयडियल,आयकॉन' बनले आहेत.
  राज्यातील महायुतीच्या काळामध्ये सक्षम विरोधीपक्षनेते पदाची यशस्वी जबाबदारी पार पाडत असताना धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढण्याचं काम केले. अधिवेशन काळात विरोधी पक्षनेते म्हणुन धनंजय मुंडे यांना जेव्हा जेव्हा मत मांडण्याची वेळ आली. तेव्हा तेव्हा आपल्या वक्तृत्वाने षट्कारावर षट्कार मारून सरकारला चारीमुंड्या चीत केले. भ्रष्टमंत्र्यांच्या विरोधात बोलत असताना त्यांनी पुराव्या सहीत भ्रष्टमंञ्याची पोलखोल केली. देवेंद्र फडणवीस सरकारमधील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडीकीस आणली. विधान परिषदे मध्ये  विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे भाषणासाठी उभे राहताच  सर्वाचे लक्ष त्यांचाकडे आकर्षित   होत आहे. विरोधक सुद्धा धनंजय मुंडे यांचे भाषण लक्ष देऊन ऐकत आसतात यावेळी़ धनंजय मुंडे आपल्या उत्तम वक्तृत्वशैलीतून शेतकरी, शेतमजूर, दीन दलित, अन्यायग्रस्तांना, पीडिताना न्याय देण्याच्याकामी शासन प्रशासन कसं कमी पडले याची सविस्तर माहिती सांगत होते. शिवाय त्या त्या प्रकरणात पीडितांना, अन्यायग्रस्तांना न्याय कसा मिळेल याची माहिती सविस्तरपणे सांगतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार मधील काही मंत्र्याना त्यांच्या भाषणाचा मोठा आधार वाटत असे तर काही भ्रष्टमंञ्याना मोठा धाक वाटत होता. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळातअनेक मंत्री धनंजय मुंडे यांना सांभाळून घ्या कधी कधी तर काम करत असताना चूक झाली तर झालेली चूक सुधारण्याची संधी द्या असे म्हणत असत.
स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर सक्षम विरोधी पक्षनेता कसा असतो हे धनंजय मुंडे यांनी दाखवून दिले आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी विरोधी पक्षनेता असताना 'संघर्ष यात्रा' काढून सत्ता परिवर्तन घडवून आणले. अगदी तसंच धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात 'हल्लाबोल, संघर्ष यात्रा आणि शिवस्वराज्य यात्रा' काढुन सत्ता परिवर्तन घडून आणण्याचे काम केले. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने चालवण्याचा काम धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय जीवनात चालू असल्याचे दाखवून दिले आहे.
राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक मातब्बर नेते विकासाच्या नावाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून जात होते. तेंव्हा पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे तरुणा प्रमाणे कामाला लागले होते. या वेळी शरद पवार यांच्या सोबत सावलीप्रमाणे धनंजय मुंडे राहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्याचा कारभार करत असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकरी, शेतमजूर दीन दलित यांना आर्थिक मदत देताना हात आखडता घेतला. दुसरीकडे शेतकऱ्यांना तत्वतः कर्जमाफी असा शब्दांचा खेळ करून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यापासून वंचित ठेवले. मराठवाड्यामध्ये मागील तीन-चार वर्षापासून सतत पडत असलेला दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे यामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि महाराष्ट्रातील शेतकरी  मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. शेतात पेरणी, लावणी व मशागतीच्या कामासाठी केलेला खर्च पदरात पडत नसल्यामुळे बीड जिल्ह्यासह मराठवाडा आणि राज्यातील हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला तरी या सरकारला जाग येत नसल्याने या सरकारला शेतकरी शेतमजूर आणि गोरगरिबांच्या प्रश्नावर धारेवर धरण्याचे काम चोखपणे धनंजय मुंडे यांनी पार पाडले.
  कर्जमाफी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षणाचा झालेला विनोद आदी  गोष्टीमुळे देवेंद्र फडणवीस  सरकारच्या विरोधात जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. जनतेच्या या रोषाचा फायदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या महाआघाडीला कसा होईल याचा विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवारांनी करून या सरकारला कोंडीत पकडण्याची व्यूवरचना आखली. त्यानुसार शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली  धनंजय मुंडे यांनी या देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेतून  हद्दपार करण्यासाठी जिवाचे रान केले. एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार घालविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना शरद पवारांचे विचार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार, पक्षाची ध्येय धोरण धनंजय मुंडे यांनी राज्यातील घरा-घरात पोहचले. 2014 च्या निवडणुकीच्या पूर्वी दरवर्षी एक लाख बेरोजगार  तरुणांना रोजगार उपलब्ध करून देऊ असा वचननामा महायुतीच्या वतीने जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाभरती करून तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु 2019 च्या विधानसभेचे पडघम वाजन्यास काही कालावधी शिल्लक असताना देवेंद्र फडणवीस सरकारने  महाभरती संदर्भात जाहिराती काढल्या. राज्यातील लाखो बेरोजगारांनी नोकरीच्या आशेपोटी फॉर्म भरले. परंतु नोकर भरती झालीच नाही. त्यानंतर विधानसभेचे निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यास काही दिवस शिल्लक असतानाच  रोजगाराची महाभरती न करता भाजपपक्ष वाढीसाठी आमदारांची महाभरती करण्याचा सपाटा लावला. भाजपामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार, नेते, कार्यकर्ते, यांची महाभरती करण्यास सुरुवात केली. भाजपमध्ये महाभरती होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  'मी' पणाच्या' अहंकाराला उधाण आलं होतं. आमच्या समोर कुस्ती खेळण्यासाठी विरोधकांकडे पहेलवान नाही. शरद पवार यांची अवस्था ही एका हिंदी सिनेमातील जेलर सारखी झाली असून 'आधे इधर जावो, आधे उधर जाओ, बाकी बचे तो मेरे पीछे आयो' अशी झाल्याचे वारंवार मीडियासमोर सांगत आपल्या ओंगळवाण्या 'मी पणाच्या' अन  अहंकाराचे प्रदर्शन करत होते. या गंभीर आणि कठीण काळात देवेंद्र फडणवीस यांच्या 'मी पणाला' घालवून देण्याचा निर्धार शरद पवार केला आणि धनंजय मुंडे यांच्यासारख्या सक्षम व कर्तव्यदक्ष राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचा निर्धार खरा करून दाखवला. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी तरुणाला लाजवेल असे काम करण्यास सुरुवात केली. या वेळी शरद पवारांच्या मागे मोठी ताकत निर्माण करण्याचे काम ज्या ज्या सच्चा सैनिकांनी केले. त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व मित्रपक्षाच्या आघाडीला बहुमत मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचाराची धुरा धनंजय मुंडे यांच्या खांद्यावर आली होती.  तर दुसरीकडे स्थानिक परळी मतदारसंघांमध्ये त्यांची लढाई ही सरकारमधील एका जबाबदार मंत्र्याच्या, जनतेच्या मनातील मुख्यमंत्र्याच्या म्हणजेच बहिण पंकजा मुंडे यांच्याशी असल्यामुळे या निवडणुकीमध्ये  विजयी  होण्यासाठी धनंजय मुंडे यांना मोठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार होती. एकीकडे  विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांच्यासह अर्ध्यापेक्षा जास्त मंत्रिमंडळ प्रचाराच्या कामाला लागले होते. तर दुसरीकडे एकाट्या धनंजय मुंडे यांनी परळी मतदार संघात आपल्या बहाद्दर सैन्यांच्या मदतीने यशस्वी लढत दिली. यात भर पडली ती परळी विधान सभा मतदारसंघात धनंजय मुंडे हे सतत सामान्य नागरिकांच्या मदतीला धावून जात असल्यामुळे धनंजय मुंडेंना सामान्य जनतेचे भरभरून प्रेम मिळत आहे. याच प्रेमाचे रुपांतर निवडणूकीच्या काळात मतदानात झाल्यामुळे
परळी विधानसभा मतदार संघातील मतदार बंधुभगिनीनी मोठ्या मताधिक्याने 'विजयश्री' धनंजय मुंडे यांच्या गळ्यात घातली. देशाचे पंतप्रधान प्रचाराला येऊनसुद्धा धनंजय मुंडे यांचा 30 हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने  विजय होतो. ही गोष्ट निश्चितच धनंजय मुंडे यांनी केलेल्या कार्याची पावती होती. काम करत असताना धनंजय मुंडे हे कधी भेदभाव करत नाहीत. अनेक प्रसंगी ते विरोधी पक्षातील अडचणीत सापडलेल्या कार्यकर्त्याच्या मदतीला धावून येतात. त्यामुळे सध्या परळी मतदार संघात धनंजय मुंडे यांची मोठी  क्रेज निर्माण झाली.
  2019 विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून राज्यातील सत्तेची समीकरणे सारखी बदलत गेली. शेतकऱी, शेतमजुर कष्टकऱ्यांना आपलं वाटणार सरकार सत्तेत आणण्यासाठी महिनाभर उलथापालथ झाली. सत्तेच्या वाटाघाटींमध्ये शरद पवारांसोबत धनंजय मुंडे हे नेहमी दिसून येत असत. त्यामुळे निश्चितच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी सरकार मध्ये त्यांना महत्त्वाचं खात मिळून मंत्रिपदीवर्णी लागणार आहे. सध्या ते 'सत्तेच्या परिघात' आले आहेत. मागच्या विधानसभेच्या काळात पाॅवरफूल विरोधी पक्षनेता म्हणून काम करणाऱे धनंजय मुंडे या महाविकास आघाडी सरकारमध्ये  कार्यक्षम विकासप्रिय सत्ताधारी मंत्री म्हणून काम करत असल्याचे आपल्याला दिसत आहेत. धनंजय मुंडे यांचा स्वभाव पाहता ते 'सत्तेला' साधन म्हणून पाहत आहेत. त्यांनी या सत्तेच्या साधनाच्या माध्यमातून जनसेवेचा 'यज्ञ' अखंडपणे धगधगता ठेवला. सत्तेच्या काळात जास्तीत जास्त लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांच्या घराचे दार कायम जनतेसाठी उघडे आहेत. एकंदरीतच धनंजय मुंडे यांच्या 'सामाजिक न्याय मंत्रिपदाचे वलय' हे जनतेच्या कामासाठी, विकासासाठी कायम राहिले आहे पुढे ही कायम राहील हे निश्चित आहे. जनतेसाठी कायम सेवेत राहणा-या ना. धनंजय मुंडे साहेबांचा आज वाढदिवस आहे.या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना संपूर्ण राज्यातील, जिल्ह्यातील माता भगिनी,गोर गरीब जनतेचा आशीर्वाद कायम मिळणार आहे.
त्यांना भावी जीवनास त्यांच्या उज्ज्वल वाटचालीस लक्ष लक्ष शुभेच्छा..!


श्री.आत्माराम पांडुरंग वाव्हळ |बीड
मो.न. 8275268589

___________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन