पन्नास पॉझिटिव्ह , तीन मृत्यू , बिडकरांसाठी सोमवार धक्कादायक ! जिल्ह्यात एकच खळबळ
पन्नास पॉझिटिव्ह , तीन मृत्यू , बिडकरांसाठी सोमवार धक्कादायक !
जिल्ह्यात एकच खळबळ
बीड प्रतिनिधी:
सोमवारचा दिवस कोरोना बधितांच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी धक्कादायक ठरला. सोमवारी सकाळी २४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री पुन्हा २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात तब्बल ५० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाल्यामुळे एकीकडे भीतीचे सावट निर्माण झालेले असताना आणि सकाळी २४ अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रात्री पुन्हा २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने नागरिकांतून भीती व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा