उद्या बारावीचा निकाल जाहीर होणार!
मुंबई प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेला बारावीचा निकाल उद्या गुरुवार दिनांक १६ जुलै रोजी जाहीर होणार आहे .विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर हा निकाल पहावा असे मंडळाने सूचित केले आहे . महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी - मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या गुरुवार, 16 जुलै 2020 रोजी जाहीर होणार आहे . दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर हा निकाल विद्यार्थी - पालकांना पाहता येईल . याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली आहे . महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे . कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने गेले अनेक दिवस १२ वीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष या निकालाकडे लागून राहिलं होतं . अखेर बोर्डाने आज निकालाचा दिवस जाहीर केला आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा