अंबाजोगाई शहरातील काही ठिकाणी आणि शिरूर कासार, गेवराई, परळी या तालुक्यातील काही गावांमध्ये कंटेनमेंट झोन घोषित*

*

 बीड, दि, २२: अंबाजोगाई शहरातील गौंड गल्ली, शिरूर तालुक्यातील बारगजवाडी, गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव आणि  परळी वैजनाथ तालुक्यातील धर्मापुरी येथे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे 
असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.

अंबाजोगाई शहरातील गौंड गल्ली येथे १ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने दौंड गल्ली येथील अशोक विश्वंभर देशपांडे यांचे घर ते रमेश रंगराव पत्की यांच्या घरापर्यंतचा परिसर  पूर्णवेळ अनिश्‍चित कालावधीसाठी कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

         शिरूर तालुक्यातील मौजे बारगजवाडी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून  हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे 

गेवराई तालुक्यातील मौजे बाग पिंपळगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे 

परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे धर्मापुरी येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे  हे गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे 

        याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून ही गावे अनिश्‍चित कालावधीसाठी बंद करण्यात आली आहेत 
       राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ जुलै २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक ३१ जुलै २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन