काही शिक्षकांमुळे ऑनलाइन पद्धतीला खीळ - पत्रकार एस.एम.युसूफ

काही शिक्षकांमुळे ऑनलाइन पद्धतीला खीळ - पत्रकार एस.एम.युसूफ

बीड (प्रतिनिधी) - सध्या राज्यातील सर्व शाळांमधून विद्यार्थ्यांना 
मोबाईल व्हॉट्सऍप माध्यमातून  ऑनलाईन पध्दतीने शिक्षण देणे सुरू केले आहे. त्यासाठी इयत्तानिहाय व्हाॅट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. नव्याचे नऊ दिवस ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणे चांगले वाटले. परंतु सध्या मात्र काही शिक्षकांमुळे ऑनलाइन पद्धतीला खीळ बसत आहे. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बाबतीत विद्यार्थी संबंधित शिक्षकांना जेंव्हा फोन करतात तेंव्हा बहुतांश शिक्षक विद्यार्थ्यांचे फोन घेत नाहीत. या बाबतीत त्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असता मुख्याध्यापक ही त्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप पत्रकार  एस.एम.युसूफ यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातुन केला.
काही शाळेतील शिक्षक, महिला शिक्षिकांकडून 
  या विषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, शासनाच्या आदेशाबरहुकूम सगळीकडे ऑनलाइन शिक्षण देण्याची सुरुवात १५ जून पासून सुरु झालेली आहे. कोरोना महामारीमुळे पर्यायी व्यवस्था म्हणून शासनाने ऑनलाईन शिक्षण पद्धती तयार केल्याने त्या आराखड्यानुसार शाळांनी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणे क्रमप्राप्त आहे. यानुसार काही कर्तव्यदक्ष शिक्षक आणि अपवादात्मक शिक्षिकांना सोडले तर ऑनलाइन शिक्षण प्रणाली ला दस्तुरखुद्द शिक्षिका खो देत असल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांचे तयार केलेले व्हिडिओ, ऑडिओ,लिंक्स विविध ॲप्स द्वारे विद्यार्थ्यांना पाठवून शिक्षण दिले जात आहे. या पद्धतीचा विद्यार्थ्यांना कितपत लाभ होईल? ते कालांतराने दिसून येईलच! मात्र या पद्धतीने शिक्षण देण्यासाठी शाळांकडून जे व्हॉट्सऍप ग्रुप बनविण्यात आलेले आहेत त्यांची सेटिंग ओन्ली ॲडमिन प्रकारची आहे. यामुळे यात फक्त शाळा आणि शिक्षकांकडून टाकण्यात आलेले संदेश विद्यार्थी पाहू शकतात. परंतु जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न किंवा इतर काही शैक्षणिक माहिती अथवा शंका निरसन जेव्हा शिक्षकांकडून करून घ्यायचे असते तेव्हा विद्यार्थ्यांना संबंधित विषयासाठी नेमलेल्या शिक्षकांकडे त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सऍप क्रमांकावर संदेश टाकावे लागतात. काही  शिक्षक संदेश पाहून विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्न सोडवितात. शंका निरसन करतात. काही शिक्षकांनी व्हॉट्सऍप संदेश पाहिला नाही तर विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यास ते भ्रमणध्वनीवर विद्यार्थ्यांशी बोलून त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आणि शंकानिरसन करण्याचे कार्य करत असल्याचे दिसून आले. तर दुसरीकडे काही  शिक्षकांना तर ऑनलाइन शिक्षण पद्धती जड झाली? की त्यांना याचा कंटाळा येतोय? हे कळायला मार्ग नाहीये. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नेमून दिलेल्या विषयांसाठी असलेल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांनी त्यांच्या वैयक्तिक व्हॉट्सऍप क्रमांकावर प्रश्न किंवा शंकानिरसन करण्यासाठी संदेश टाकला तर काही शिक्षकांनी पालकांचे पर्यायाने विद्यार्थ्यांचेच  व्हॉट्सऍप क्रमांक ब्लॉक करून टाकल्याचे दिसून आले. शिक्षकांच्या या कृतीमुळे ऑनलाइन शिक्षण पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिक्षकांनी जेव्हा विद्यार्थ्यांचे व्हॉट्सऍप क्रमांक ब्लॉक केल्याचे समोर आले तेव्हा विद्यार्थ्यांनी संबंधित शिक्षकांच्या वैयक्तिक संपर्क क्रमांकावर भ्रमणध्वनीवरून बोलण्याचा प्रयत्न केला असता ते फोनही उचलत नाहीत. एक नाही चार वेळा जरी विद्यार्थ्यांनी फोन लावला तरी काही शिक्षकांकडून फोन उचलले जात नाहीत. याबाबत शाळेचे मुख्याध्यापकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधुन माहिती दिली असता ते देखील  सदर बाबीस गांभीर्याने घेत नसल्याचे  समजते अशा स्थितीत मग आता विद्यार्थ्यांनी आपआपल्या घरात बुजगावणे उभे करून त्याच्याकडून शिक्षण घ्यावे? की एकलव्य ने द्रोणाचार्यांचा पुतळा उभा करून जशी धनुर्विद्या आत्मसात केली होती तसे आता या शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचे पुतळे घरात निर्माण करून त्या पुतळ्यांकडून शिक्षण घ्यावे? या प्रश्नांचे उत्तर शिक्षणाधिकाऱ्यांनी म पालकांना आणि विद्यार्थ्यांना द्यावे.
शिवाय ऑनलाइन शिक्षणाचा बोजवारा उडवू पाहणाऱ्या अशा कर्तव्य चुकार शिक्षक व शिक्षिकांसह मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्यावर थेट कारवाया करावी. तसेच संपूर्ण बीड जिल्ह्यातील एकूण  शिक्षक, शिक्षिका, मुख्याध्यापक/प्राचार्य  यांचे संपर्क क्रमांक  (संभाषण आणि व्हॉट्सऍप) विद्यार्थी आणि पालकांसाठी जाहीर करुन संपर्कासाठी उपलब्ध राहण्याची सक्ती करावी अशी मागणी पत्रकार तथा शिक्षणमित्र एस.एम.युसूफ यांनी दिलेल्या निवेदनातून केली.
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन