दिवसातील अॅन्टीजेन टेस्टमध्ये 6 शहरात 690 पॉझिटिव्ह !

3 दिवसातील अॅन्टीजेन टेस्टमध्ये
6 शहरात 690 पॉझिटिव्ह !

बीड (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पाच शहरात कालपासून सुरु असलेल्या व्यापाऱ्यांच्या अॅन्टीजेन टेस्टमध्ये आज पुन्हा 248 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत . मंगळवारी 212 , बुधवारी 230 व्यापारी या पाच शहरात पॉझिटिव्ह आढळून आले होते. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यापाऱ्यांसह आता तीन दिवसातील सहाही शहरातील पॉझिटिव्ह व्यापाऱ्यांची संख्या 690 झाली आहे. 
  अंबाजोगाई , आष्टी , केज , माजलगाव , परळीत 18 , 19 आणि 20 ऑगस्टपर्यंत व्यापारी व इतर सर्व  व्यावसायिकांच्या अॅन्टीजेन टेस्ट करण्याचं नियोजन जिल्हा प्रशासनाकडून सुरु होते . त्यात 19 ऑगस्ट रोजी 6189 अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 230 व्यापारी पॉझिटिव्ह आढळून आले . 
18 ऑगस्ट रोजी 5769 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या त्यात 212 जण पॉझिटिव्ह आढळून आले. अँटीजन तपासणीच्या तिसऱ्या दिवशी 20 ऑगस्ट रोजी तब्बल 5877 व्यक्तींची तपासणी करण्यात आली . यात 248 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत . यामध्ये परळीत सर्वाधिक 100 तर माजलगाव 62 , अंबाजोगाई 38 , केज 28 , आणि आष्टीच्या 20 व्यक्तींचा समावेश आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन