संकटाशी सामना करण्याचे धैर्य विद्यार्थ्यांत निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी करावे: श्री गणेश वाघ*

*संकटाशी सामना करण्याचे धैर्य विद्यार्थ्यांत निर्माण करण्याचे काम शिक्षकांनी करावे: श्री गणेश वाघ*


*श्री महालक्ष्मी  विद्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण संपन्न*


बीड (प्रतिनिधी): 
 कोरोनाचं संकट हे आता पर्यंतच्या संकटात सर्वात मोठं संकट असून 
प्रतिबंधक नियमांचे पालन करून कोरोनाला हरवून देशसेवा करूया असे सांगत कोरोनाच्या काळात मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना दिलेल्या जाणाऱ्या शिक्षणातून संकटाशी सामना करण्याचे धैर्य निर्माण करण्याचे काम शिक्षकच करू शकतात ते शिक्षकांनी करावे असे अवाहन शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तथा आदर्श मुख्याध्यापक श्री गणेश वाघ यांनी  शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहणा नंतर शिक्षकांना मार्गदर्शन करताना केले.
      बीड शहरापासून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त संस्थेचे संचालक तथा आदर्श मुख्याध्यापक श्री गणेश वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  ध्वजारोहणाच्या प्रसंगी फिजीकल डिस्टन्स ठेवण्यात आले होते.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर श्री. गणेश वाघ सरांनी शाळेतील शिक्षकांशी संवाद साधला. 
यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना श्री.गणेश वाघ सर म्हणाले की कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शाळा बंद पण शिक्षण मोबाईल द्वारे शिक्षण देणे सुरू आहे. मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना दिलेल्या जाणाऱ्या शिक्षणातून संकटाशी सामना करण्याचे धैर्य विद्यार्थ्यांत निर्माण करण्याचे काम शिक्षकच करू शकतात आणि सर्व शिक्षकांनी ते करावे असे आवाहन करत ऑनलाइन शिक्षणाबाबत असणा-या अद्यावत साधनांची, सुविधांची माहिती दिली. आजच्या या मंगलदिनी विद्यार्थ्यांची उणीव प्रखरतेने जाणवत आहे. विद्यार्थी हे प्रेरणास्थान आहेत. विद्यार्थी शिक्षकांना बळ देतात ते शिक्षकांचं शक्तीपीठ असून आजचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांविना साजरा करावा लागत असल्याची खंत श्री वाघ सरांनी व्यक्त केली. आज संपूर्ण जगासोबत भारत देशावर ओढावलेले कोरोनाचं संकट हे आता पर्यंतच्या संकटात सर्वात मोठं संकट असून प्रतिबंधक नियमांचे पालन करत आहोत. आपण सर्वजण कोरोनामुक्तीचा लढा एकजुटीनं लढत आहोत. लवकरच आपण कोरोनावर विजय मिळवू असा विश्वास श्री गणेश वाघ सरांनी व्यक्त केला.
  या वेळी पुढे बोलताना श्री गणेश वाघ सर म्हणाले की, प्रत्येकांनी या पुढे जाऊन सामाजिक जाणीव, राष्ट्रीय कर्तव्य व जबाबदारीच्या भावनेतून कोरोनाचा प्रसार रोखण्यास, देशवासियांचे प्राण वाचवण्यास प्राधान्य देत असताना स्वत:सह कुटुंबाचा आणि परिसरातील इतरांचाही कोरोनापासून बचाव करावा. कोरोनामुक्तीच्या या लढ्यात समाजातील सर्व घटकांचे योगदान कसे राहील यासाठी प्रयत्न करावा. ख-या अर्थाने आजच्या घडीची ही सर्वात मोठी देशसेवा आहे. या लढ्यात  पहिल्या फळीत लढत असलेले डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलीस, शिक्षक, पत्रकार अंगणवाडीताई, आशाताई, शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज संस्थांचे अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते यांचे ही मोठे योगदान आहे. हे योगदान महाराष्ट्र कधीच विसरणार नाही. या सर्व बहाद्दर देशसेवकांची देशसेवा भावी पिढीला मार्गदर्शक ठरणार आहे. तेंव्हा सर्वांनी एकजूट होऊन देशाला समृद्ध, बलशाली देश बनवण्याचा निर्धार करण्याचे आवाहन असं शेवटी गणेश वाघ सरांनी केलं.                                         I     याळी श्री. चव्हाण डि.बी.,श्री.वाव्हळ ए.पी. श्रीमती साळुंके पी.के.,श्रीमती सानप वाय.एस. श्री.गुजर जी.एस. श्री.यादव, श्री थोरात, श्री.धुरंधरे आदी उपस्थित होते.
_______________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन