बीड शहरात गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर

बीड शहरात गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी द्या-नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर
बीड (प्रतिनिधी)-गणेशोत्सव हा सण साजरा करण्याची बीड शहरात शेकडो वर्षाची परंपरा आहे. मात्र कोरोना काळात या सणावर काही बंधने आहेत. तरीही नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी बीडचे नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
बीड शहरात गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांची कोणाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा करण्यासाठी अडचणी निर्माण होऊ लागले आहेत. त्यामुळे दिनांक 22 रोजी नियमांचे काटेकोरपणे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्यात परवानगी देण्यात यावी अशी मागणी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उत्सव साजरा करण्यासाठी अनेक मंडळांनी मागणी केली आहे त्यामुळे कोरोना विषयक नियमांचे पालन करून त्यांना परवानगी दिल्यास गणेशोत्सव साजरा करता येईल,असेही निवेदनात म्हटले आहे यावेळी अरुण डाके,अॅड. राजेंद्र राऊत हेही उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन