जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांची कवडगावला भेट:जनावरांच्या आजारावर तत्काळ उपचार करण्याच्या केल्या सूचना*
*जिल्हा पशुसंवर्धन अधिका-यांची कवडगावला भेट*
*जनावरांच्या आजारावर तत्काळ उपचार करण्याच्या केल्या सूचना*
कवडगाव बु. (शांतिनाथ जैन )
वडवणी तालुक्यातील कवडगाव बु.येथील सुमारे ७०%जनावरांना विविध रोगांनी गेल्या २ महिन्यापासुन पछाडलेले आहे मात्र जि प.च्या पशू वैद्यकीय विभाग यावर उपाययोजना व उपचार करायला तयार नव्हता. याबाबत वृत्त प्रकाशित होताच पशुवैद्यकिय विभाग खडबडुन जागा झाला.
याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे जिल्हा पशू संवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी आज कवडगावला भेट दिली. यावेळी त्यांनी जनावरांच्या आजाराची स्वतः पाहणी करुन यावर तत्काळ उपचार करण्याच्या सूचना उपस्थित पशुधन अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या .
याबाबत अधिक माहिती अशी की वडवणी तालुक्यातील कवडगाव बु. येथे गेल्या २ महिन्यापासुन जनावरांना विविध आजाराने ग्रासल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. शेतक-यांना ऐन शेतीच्या कामाच्या वेळेतच हा आजार आल्याने शेती पडीक पडण्याची वेळ आली आहे. जनावरांच्या अंगावर चट्टे येणे गळा सुजणे अशा विविध आजाराने जनावरांना पछाडले आहे. त्याचे सावट पोळा या सर्वात मोठा समजल्या जाणाऱ्या सणावर दिसुन आले. एकीकडे कोरोना लाँकडाऊन मुळे सार्वजनिक पोळा साजरा न करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश तर दुसरीकडे जनावरांना आलेला हा आजार त्यामुळे येथील शेतकऱ्याने पोळा सण साजरा केलाच नाही. या बाबतची बातमी प्रकाशित होताच वडवणी येथील तालुका पशुधन अधिकारी लांडे मँडम व डाॅ. उजगरे यांनी भेट दिली. त्यानंतर आज दि.१९ रोजी बीडचे जिल्हा पशू संवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी कवडगावला भेट दिली. यावेळी शेतक-यां सोबत सुमारे १ तास चर्चा केली. यावेळी त्यांनी संबधित अधिकारी व कर्मचारी यांना या रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी फवारण्या व लसीकरणाचे आदेश दिले. यावेळी त्यांच्या समवेत जि.प. सदस्य औदुंबरकाका सांवत, महादेवराव अंबुरे, सरपंच संदिपानराव खळगे, पशु चिकित्सक शुक्लासाहेब, पशु वैद्यकीय अधिकारी काकडे,भारत आबुज, लांडे मॅडम, पाटणकर, उजगरे, मेहेत्रे, शेटे, खांडे, आदी उपस्थित होते. यावेळी मी स्वतः लक्ष देऊन येत्या आठ दिवसात पुन्हा दुसरी लस मागाऊन या रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासंबधी प्रयत्नशील आसल्याचे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी विजय देशमुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी शे.शाकेरभाई शे.आसेफभाई बब्रुवान, सरगर नवनाथ पडघन, महादेव काळे, महादेव रासवे, शेरु पटेल, दिनेश डोंबाळे, आकबर पठाण, आवेज पठाण आदि शेतकरी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा