श्री गणेश मूर्ती दुकानासह , हार , फुले , फळे , मेडिकल , किराणा दुकानं उघडण्यास परवानगी

श्री गणेश मूर्ती दुकानासह , हार , फुले , फळे , मेडिकल , किराणा दुकानं उघडण्यास परवानगी 

बीड (प्रतिनिधी) -बीड शहरा साहित 6 शहरात 21 ऑगस्ट पर्यंत लावण्यात आलेल्या संचारबंदी मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून गणेश मूर्तीची दुकाने , हार , फुले , फळे , मेडिकल , किराणा दुकानं उघडण्यास परवानगी दिली आहे .एक प्रकारे प्रशासनाने लॉक डाऊनला काही प्रमाणात ढिल दिली आहे.
 जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर बीड , परळी , अंबाजोगाई , माजलगाव , केज आणि आष्टी या सहा शहरात 12 ते 21 ऑगस्ट पर्यंत लॉक डाऊन चा निर्णय जाहीर केला होता. यावेळी सर्व प्रकारची दुकाने , मेडिकल सुद्धा बंद ठेवण्याचे आदेश दिले होते . दरम्यान गणेशोत्सव आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लॉक डाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. आजपासून या सहा शहरात दोन फुटाच्या गणपती विक्रीची दुकाने , मेडिकल , फळ , फुल विक्रीची दुकाने , अगरबत्ती , पूजा साहित्य तसेच किराणा इत्यादी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.


ही दुकाने उघडण्यास परवानगी

श्री गणपती मूर्ती , पूजा साहित्य व इतर दुकाने उघडण्यास परवानगी

----------------------------------------
ही दुकाने बंद राहणार

हॉटेल , मिठाई दुकान , कापड दुकान , आदी मोठी दुकाने बंद राहणार

---------------------------------------

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन