आज अँटीजन तपासणी;२१०रुग्ण पॉंझिटिव्ह!
आज अँटीजन तपासणी;२१०रुग्ण पॉंझिटिव्ह!
बीड (प्रतिनिधी):
बीड जिल्हयातील कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हयातील कोरोना विषाणूचे वाढते संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन अनेक युक्त्या लढवून कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हयातील सर्व व्यापाऱ्यांची अँटीजन तपासणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतल्यानंतर आज सकाळपासून तपासणीला सुरूवात झाली.आणि ५७५६ जणांच्या अँटीजन टेस्ट करण्यात आल्या.
जिल्ह्यातील पाच शहरात आज झालेल्या अँटिजेन टेस्टमध्ये 210 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे . पहिल्याच दिवशी 210 रुग्ण आढळले असून आणखी दोन दिवस या टेस्ट होणार आहेत . माजलगाव शहरात सर्वाधिक 71 तर परळीत 66 रुग्ण आढळून आले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा