आज 146 कोरोना पॉझिटिव्ह!

आज 146 कोरोना पॉझिटिव्ह!

बीड (प्रतिनिधी): जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला असून बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ  होत आहे. आज मंगळवार ( दि .22 ) 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा 8 हजार 608 इतका झाला आहे . सोमवारी ( दि .21 ) एकूण 1152 स्वॅबची तपासणी करण्यात आली . त्याचे अहवाल मंगळवारी दुपारी 2 वाजता आरोग्य विभागास प्राप्त झाले. त्यामध्ये 1006 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 146 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले . बाधित रुग्णांमध्ये बीड तालुक्यात 33 रुग्ण आढळले. पाठोपाठ अंबाजोगाई 32 , आष्टी 11 , धारुर 10 , गेवराई 13 , केज 14 , माजलगाव 11 , परळी 9 , पाटोदा 6 , शिरुर 6 आणि वडवणी तालुक्यातील 4 जणांचा समावेश आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन