कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना केज आदर्श पत्रकार समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना केज आदर्श पत्रकार समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण
केज (दशरथ चवरे):
राज्यातील कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या पत्रकारांना आदर्श पत्रकार संघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या बाबतची माहिती अशी की, जोखमीचे वृत्त संकलन करताना राज्यातील अनेक पत्रकारांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात पत्रकार संतोष पवार, पांडुरंग रायकर आणि अनेक पत्रकार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोरोना बातम्यांचे संकलन करताना करोनाची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना आदर्श पत्रकार समितीच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आदर्श पत्रकार समिती केजचे अध्यक्ष विजयराज आरकडे यांनी शासकीय विश्रामगृहावर शोकसभा आयोजित केली होती. त्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराज आरकडे, सतिश केजकर, गौतम बचुटे, दशरथ चवरे, धनंजय कुलकर्णी, अशोक सोनवणे, प्रकाश मुंडे,अनिल गलांडे, रमेश इतापे, चंद्रकांत पाटील, बळीराम भोसले यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा