महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वडवणी तालुका उपाध्यक्षपदी सचिन मुंडे महाराज यांची निवड
महाराष्ट्र वारकरी महामंडळाच्या वडवणी तालुका उपाध्यक्षपदी सचिन मुंडे महाराज यांची निवड
वडवणी दि .६ ( प्रतिनिधी ) महाराष्ट वारकरी महामंडळ महाराष्ट राज्य यांच्या वडवणी तालुका युवा उपाध्यक्षपदी वडवणी तालुक्यातील देवडी येथील ह.भ.प.सचिन महाराज मुंडे यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे .
याबाबत अधिक माहिती अशी की , आजचा समाज शारिरीक , मानसिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम व्हावा तसेच सुसंस्कारी , सदाचारी , व्यसनमुक्त व्हावा . समाजामध्ये संत साहित्याची ओळख , जागृती व आवड निर्माण व्हावी यासाठी अध्यात्मिक ज्ञान आणि भारतीय संस्कृतीच्या विचारांचा प्रचार प्रसार व प्रबोधनाच्या माध्यमातून गावोगावी लोकांचे संघटन करून समाजातील हिताच्या गोष्टींसाठी संघर्ष करून समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला सुख , आनंद , समाधान आणि शांतता प्राप्त व्हावी आणि समाजामध्ये एकमेकांविषयी आपुलकी , प्रेम , बंधुभाव , प्रेरित करून समृध्द बलशाली भारत निर्माण व्हावा व प्रत्येक व्यक्ती देशभक्तीने प्रेरित होऊन समाज कार्य करेल असा आदर्श वारकरी तुमच्या हातून घडो यासाठी दिनांक ४ सप्टेंबर २०२० रोजी महाराष्ट वारकरी महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या वडवणी तालुका युवा उपाध्यक्षपदी वडवणी तालुक्यातील देवडी या गावचे रहिवासी युवा प्रबोधनकार ह.भ.प.सचिन महाराज मुंडे यांचे महाराष्ट वारकरी महामंडळाचे विभागीय अध्यक्ष महंत ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री व बीड जिल्हा युवा अध्यक्ष ह . भ . प . भागवताचार्य गोविंद महाराज मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे धार्मिक, अध्यात्मिक व वारकरी सांप्रदायातून अभिनंदन होत आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा