जोरदार पावसामुळे कुक्कडगाव, चव्हाणवाडी, राक्षसभुवन, खुंड्रसचा संपर्क तुटला ; पिके धोक्यात !

जोरदार पावसामुळे कुक्कडगाव, चव्हाणवाडी, राक्षसभुवन, खुंड्रसचा संपर्क तुटला ; पिके धोक्यात !


पिंपळनेर दि. २६ ( शिवप्रसाद सिरसाट )-गेल्या  तीन-चार दिवसांपासून बीड जिल्ह्यासह पिंपळनेर परिसरात  जोरदार  पाऊस पडत आहे. या पावसामुळे सर्वच नद्यांना पाणी आले. काही तलाव ओसंडून वाहत आहेत. रात्री पुन्हा बीड  तालुक्यासह कुक्कडगाव , भाटसागवी , सह इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडल्याने  पावसामुळे आज शनिवार  सकाळपर्यंत काही नद्यांना पूर आला होता. सदरील पूराचे पाणी सकाळ पर्यंत वाहत होते. भाटसांगवी येथील नदीला पूर आल्याने या परिसरातील कुक्कडगाव, चव्हाणवाडी, राक्षसभुवन, खुंड्रस या गावांचा संपर्क तुटला आहे. 
    सध्या परतीच्या पावसाने मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री बीड तालुक्यासह पिंपळनेर परिसरातील  अनेक  ठिकाणी पाऊस पडला. या पावसामुळे शनिवारी  सकाळपर्यंत अनेक नद्या वाहत होत्या. बीड तालुक्यातील भाटसांगवी येथील नदीला पुर आला. या पुराचे पाणी दुपारपर्यंत ओसरलेलं नव्हतं. पुरामुळे कुक्कडगाव, चव्हाणवाडी, भाटसांगवी, राक्षसभुवन, खुंड्रस या गावातील संपर्क तुटलेला होता. 

कापसाचे बोंड 
काळे पडू लागले!
मराठवाड्यामध्ये अतिरिक्त पाऊस पडू लागल्यामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागले. ऊस पिवळा  पडला तर शेकडो हेक्टरमधील कापूस पाण्यात गेला आहे. जास्तीच्या पाण्याने कापसाचे बोंडे काळे पडू लागल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान होऊ लागले आहे. उत्पन्नावर मोठा फरक पडणार असल्याचे  बंडू ठाकरे या शेतकऱ्यांनी  सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन