मुकादम मुक्त ऊसतोड कामगार करा - किसान पुत्र श्रीकांत गदळे

मुकादम मुक्त ऊसतोड कामगार करा - किसान पुत्र श्रीकांत गदळे

बीड : राज्यातील ऊसतोड कामगारांची  हा आर्थिक परिस्थितीने मागास असून कामगारांचा कोणी वाली नाही. यामुळं मुकादम या कामगारांवर आपलं वर्चस्व निर्माण करून त्यांची आर्थिक पिळवणूक करीत आहेत. त्यामुळेच या ऊसतोड कामगारांना मुकादम मुक्त करण्यात यावं अशी मागणी किसानपुत्र श्रीकांत गदळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. 
दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राज्यातील ऊसतोड कामगार सामाजिक दृष्ट्या मागास असून राज्यातील ऊसतोड कामगारांचा नेता नाही. राजकारणा पुरता त्यांचा वापर करून पुन्हा त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. याचाचं फायदा घेऊन मुकादम मंडळी त्यांचं आर्थिक शोषण करत असल्याचा आरोप श्री. गदळे यांनी केला आहे. 
यामुळे ऊसतोड कामगारांच्या तोडणीचा दर व वाहतुकीचा मोबदला जास्तीत-जास्त देवून प्रत्यक्ष कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. तसेच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महामंडळ अंतर्गत प्रशासक नेमून ऊसतोड कामगार मुकादम मुक्त करून राज्यातील मुकादमांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी किसानपुत्र श्रीकांत गदळे निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन