*कोरोनाच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात माफी द्यावी*
*कोरोनाच्या काळात महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात माफी द्यावी*
*शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस प्रशांत डोरलेंची पत्राद्वारे जिल्हाधिकारी यांना विनंती*
बीड (प्रतिनिधी) :-
कोरोनामुळे सध्या सर्वांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आहे. पोटापाण्याची सोय लावणे शक्य नसताना आता मुलांच्या प्रवेश फीचे ओझे देखील पालकांच्या खांद्यावर येऊन पडले आहे. शिवसंग्राम युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली या अडचणीच्या काळात महाविद्यालयांनी त्या त्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी शिवसंग्राम जिल्हा सरचिटणीस प्रशांत डोरले यांनी केली आहे.
कोरोनाच्या कठीण काळात सर्वत्र आर्थिक सावट पसरले आहे, अशा काळात व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असणाऱ्या शैक्षणिक शुल्कांमध्ये माफी मिळाल्यास पालकांना दिलासा मिळेल. यासाठी बीड जिल्हाधिकारी, व जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्रशांत डोरले यांनी पत्र देत विनंती केली आहे. यामध्ये अभियांत्रिकी, औषधनिर्माण, तंत्रशिक्षण, संगणक शास्त्र, वैद्यकीय महाविद्यालय, कृषी व तंत्रशिक्षण, पारंपरिक अभ्यासक्रम आदी महाविद्यालयांना हे पत्र ई-मेल द्वारे दिले आहे. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष रामहरी भैय्या मेटे, राजेंद्र आमटे, मच्छिंद्र कुटे, सतिराम ढोले, अनिकेत देशमुख, सागर जाधव, यांच्यासह शिवसंग्राम विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा