मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने गांधी जयंती साजरी
मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने गांधी जयंती साजरी
बीड दिली.२ (प्रतिनिधी) - आज २ ऑक्टोबर २०२० शुक्रवार रोजी राष्ट्रपिता महात्मा मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गांधी जयंतीच्या निमित्ताने शहरातील जिल्हा कारागृहाच्या बाजूच्या माने कॉम्प्लेक्स चौकात महात्मा गांधी यांच्या बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो या घोषवाक्याचे प्रतीक असलेल्या तीन माकडांच्या प्रतिकृतीला पाण्याने आंघोळ घालून स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर माकडांच्या प्रतिमेला फुल-हार घालून गांधीजींच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. तसेच प्रतिकृतीच्या चबुतऱ्यासमोर जिनी सायप्रस हे शोभेचे झाड लावण्यात आले. चबुतऱ्याच्या चारही बाजूला झाडू मारुन स्वच्छता करण्यात आली. तसेच जिल्हा कारागृहामागे जिथे रस्त्यावरून ये-जा करणारे लोक लघुशंका करीत होते, तिथे वडाचे झाड लावण्यात आले. यासह अहेमदनगर रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिसरामध्ये वड, पिंपळ आणि इतर वाणाची झाडे लावण्यात आली. यानंतर मल्टीपर्पज ग्राउंड मध्ये महात्मा गांधीजींच्या अर्धाकृती पुतळ्याला हार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय तांदळे, दत्तात्रय करांडे, पत्रकार एस.एम.युसूफ, संजय नवले, डॉ. आनंद कुमार, सृष्टी तांदळे, आरती माने, गणेश माने, सुदाम कोळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा