राज्यात पावसाचा धोका टळलेला नाही ; लष्करासह सर्व यंत्रणा हाय अलर्टवर

धोका टळलेला नाही ; लष्करासह सर्व यंत्रणा हाय अलर्टवर 

मुंबई प्रतिनिधी:
राज्यात परतीच्या पावसाचा कहर सुरू आहे. अनेक जिल्ह्यांना पावसाने तडाखा दिला आहे . पावसाचे संकट अजूनही कायम आहे . उस्मानाबाद , सोलापूर , पंढरपूर आणि बारामती या 4 ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या ( एनडीआरएफ ) तुकड्या तैनात केल्या आहेत . तसेच वायूसेना , नौदल , लष्कर यांना तातडीच्या मदतीसाठी हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आसल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली . 


महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे 

मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रभर जनजीवन विस्कळीत झाले आहे पावसाचा हा धोका महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास राहणार आहे . त्यामुळे शेतकरी , मच्छिमार आणि नागरीकांनी काळजी घ्यावी असं आवाहनही हवामान विभागाने केलं आहे. पुढील 48 तासात महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात किनारपट्टीवर कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढेल. हा पट्टा पश्चिम- वायव्येकडे सरकत जाऊन तीव्र स्वरूपाचा होईल. त्यामुळे अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

 पुणे शहर , जिल्ह्यात मुसळधार पाऊस 

पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे . तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे . पुणे शहर परिसरात बुधवार रात्री पासूनच दमदार पाऊस पाहायला मिळत आहे . शरद पवारांच्या बारामती येथेही जोरदार पाऊस कोसळत आहे. बारामती येथे अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसले आहे . याशिवाय पुरंदर , इंदापूर , जुन्नर , मावळ , भोर , शिरूर , पुणे शहर आदी तालुक्यातही मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे . 


पुणे - सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ बंद

 पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या गावात पूर आल्याने 55 जण अडकून पडले. त्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आले. इंदापूर येथे 2 दुचाकीस्वारांना पाण्यात वाहून जाताना वाचवले. धरणाचे पाणी वाढल्याने पुणे - सोलापूर महामार्गावर भिगवण , डाळज , पळसदेव आणि इंदापूर येथे उजनी धरणाचे पाणी आल्याने वाहतूक काही काळ बंद करण्यात आली आहे .

सोलापुरात पावसाचा धुमाकूळ; सीना भोगावतीला पूर

महाराष्ट्रभर मान्सूच्या परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय . सोलापूर जिल्ह्यालाही पावसानं झोडपलंय आहे. सध्या मोहोळ तालुक्यात सीना आणि भोगावती नदी दुथडी भरून वाहत आहे . त्यामुळे तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काल ( 14 ऑक्टोबर ) रात्री पासून अनेकांना पोलिसांनी स्थलांतरित केलं. नदी काठच्या गावात जिथे लोक अडकलेली आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.

पंढरपुरात वाहतुक बंद , शेतीचं खुप नुकसान

पंढरपुरातही पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे . 8 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल आहे. अहिल्यादेवी , चंद्रभागा आणि जुना दगडीपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला त्यामुळे पंढरपूरच्या वेशीवर अनेक गाड्या थांबून आहेत . अक्कलकोटच्या रुद्देवाडी , आंदेवाडी व संगोगी ( ब ) परिसर बोरी नदीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाले आहे . उजनी धरणातून 2 लाख क्यूसेक्सने पाणी नीरा आणि भीमा नदी पात्रात सोडण्यात आल आहे.

  सांगली जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला; 22 जणांची सुटका 

सांगली जिल्ह्यात पावसाने धुमाकुळ घातला आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. सांगली शहरातील पुरात 22 जण अडकले होते . त्या सर्वांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली . मिरज - सलगरे या राज्यमार्गावर मल्लेवाडी येथे ओढ्याच्या पुलावरून जाताना तिघे वाहून गेले . यातील दोघांना वाचवण्यात यश आले . एकाचा मृत्यू झाला . जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने 20 गावांचा संपर्क तुटला आहे , तर 71 मार्ग पाण्याखाली गेले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन