धुनकवाडच्या कुलकर्णी बंधूच्या आत्मनिर्भर शेतीची राज्यात चर्चा सीताफळाला हैद्राबाद बाजारात प्रचंड मागणी

धुनकवाडच्या कुलकर्णी बंधूच्या  आत्मनिर्भर शेतीची राज्यात चर्चा

 सीताफळाला हैद्राबाद बाजारात मागणी

किल्लेधारूर दि.२८ (प्रतिनिधी)-
धारूर तालुक्यातील धुनकवाड येथील प्रगत शेतकरी कल्याण कुलकर्णी आणि त्यांच्या भावंडांनी काबाडकष्ट करून जिथे कुसळ उगवायत नाही तिथे सीताफळाची  लागवड केली. त्यांच्या सिताफळाला हैद्राबादच्या बाजारपेठेत 120 रूपायाचा भाव मिळत आहे असून सिताफळाला प्रचंड मागणी वाढली आहे. सध्या कुलकर्णी यांच्या सिताफळाच्या उत्पादनाची राज्यात चर्चा सुरू आहे.
  या बाबत अधिक माहिती अशी की धारुर तालुक्यातील धुनकवड प्रा.एस.पी., राम आणि कल्याण या  तीन भावंडांनी वडिलोपार्जित शेतीचा वारसा पुढे घेवुन जाताना अत्याधुनिक शेती करण्यावर मागच्या काही वर्षापासुन भर दिला आहे. राम कुलकर्णी यांनी वेगवेगळ्या जातीचे उत्पादन घेवुन मराठवाड्यात दुष्काळ असतानाही पंधराशे टनच्या आसपास उत्पादन घेतले तर कल्याण कुलकर्णी यांनी धुनकवाडात काबाडकष्ट करून डोंगरमाथ्यावरच्या शेतीत फळफळावळीची लागवड करून बदलुन टाकली. जिथे कुसळं यायची अगदी खडकाळ शेती  सिंचनाखाली आणताना उंच डोंगरावर शेततळे बांधले आणि जवळपास 25 एकरात केसर आंबा, मोसंबी बाग, दाळिंब आणि सीताफळी बागा लावल्या. पुर्वी मराठवाड्यातले शेतकरी पश्चिम महाराष्ट्रात शेती पाहण्यासाठी जायचे. मात्र आज अहमदनगर, औरंगाबाद, जालना, सोलापुर, कोल्हापुर, उस्मानाबाद, लातुर आदी भागातुन शेतकरी कुलकर्णी बंधुंची शेती पहायला धुनकवाडात येत आहेत. शेतीमध्ये काबाडकष्ट करून पिकवलं तर काळी आई काही ना काही पदरात टाकते. आजच्या परिस्थितीत निसर्गाची साथ मिळत नाही तो भाग वेगळा. मात्र वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी कल्याण करत असतात. मागच्या वेळी हाळदीचं प्रचंड उत्पादन घेतलं. मोसंबी उत्पादन चांगलं आलं. दाळिंब नाही म्हटलं तरी परराज्यात जातात आणि सीताफळ लागवड ही तर पाहण्यासारखी आहे. खडकाळ जमिनीवर केलेली ठिबक सिंचन व्यवस्था ज्यामुळे चांगल्या दर्जाचे सीताफळ आले आहे. माजलगाव कारखान्याचे चेअरमन धैर्यशील सोळुंके यांचं सीताफळ बाबत नेहमीच मार्गदर्शन लाभतं तर रानडे कंपनीचे श्री शाहीर यांची देखरेख असते. शेती म्हणजे आत्मनिर्भरता हे आता कोरोनासारख्या संकटात सिद्ध झालं. या संकटात देशाची सारी व्यवस्था बंद पडली. मोठे मोठे उद्योग धंदे, कंपन्या बंद पडल्या. नौकऱ्या गेल्या. मात्र एकच व्यवस्था लॉकडाऊन झाली नाही ज्याला शेती म्हणतात. उलट कोरोना संकटात शेती व्यवसायात आर्थिक गुंतवणुक असो की उलाढाल असो मोठ्या प्रमाणात वाढली. अर्थात लाकडाऊनमुळे अनेक शेतकऱ्यांचा माल बाजारात गेला नाही तो भाग वेगळा. त्याचा फटका बसला. मात्र अशाही परिस्थितीत खरी आत्मनिर्भरता शेतीमध्येच आहे. पाच एकरात सीताफळ लागवड केली असुन चांगल्या दर्जाचा बेसुमार माल सुरू झाला आहे. पहिला तोडा दोन क्विंटलच्या आसपास निघाला आणि हैद्राबादेत धुनकवाडचं सीताफळ 120 रूपये प्रति किलो याप्रमाणे बाजार मिळाला. वास्तविक पाहता केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जो कायदा केला आहे त्याची फलश्रुती या शेतकऱ्यांना मिळाली. सीताफळ विक्री करताना हैद्राबादच्या मार्केटमध्ये आडत, हमाली, कमिशन कुणालाही देण्याची गरज पडली नाही. त्याच्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी हिताचा कायदा किती फायद्याचा त्याचं हे उदाहरण असुन ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल विक्री करताना  देशाच्या कानाकोपऱ्यात काहीच खर्च येत नाही अशी प्रतिक्रिया राम कुलकर्णी यांनी दिली. बाकी काही असले तरी कुलकर्णी बंधुंची शेती खरंच धुनकवाडात येवुन पाहण्यासारखी हे मात्र निश्चित. ज्या शेतीत कल्याण कुलकर्णी सारखे प्रगत शेतकरी जीवाची परवा न करता रात्रंदिवस राब राब राबतात आणि कष्ट करतात. माझ्या भावाच्या कष्टाचं मला स्वाभिमान वाटतो असं जेष्ठ बंधु प्रा.एस. पी. कुलकर्णी सांगायला विसरले नाहीत. या कुटुंबियात नाही म्हटलं तरी यंदा चाळीस एक्कर दर्जेदार ऊस आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन