वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेचा इशारा

वादळी वाऱ्यासह मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या शक्यतेचा इशारा 

शनिवार दि. १७  (प्रतिनिधी)
भारतीय हवामान खात्याने दि १७ ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात तसेच विशेषत्वाने मराठवाड्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाच्या शक्यतेचा इशारा दिला आहे. विशेषतः १९ आणि २० ऑक्टोबर रोजी जास्त तीव्रतेने पाऊस येण्याचा इशारा प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेतात काढणीस तयार असलेल्या पिकाची पावसाची उघडीप पाहून त्वरित काढणी करावी व काढणी केलेल्या पिकाची तात्काळ सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पावसाचे पाणी शेतात, उभ्या पिकात, भाजीपाला, फळबागेत साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी व अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उताराच्या बाजूने चर काढावा. वाऱ्याच्या वेगात वाढ संभवण्याची शक्यता असल्याने नवीन लागवड केलेल्या फळबागेतील रोपांना काठीचा आधार देण्यात यावा पिकांमध्ये फवारणी, आंतरमशागतीची कामे आणि उभ्या पिकात खते देण्याची कामे पुढे ढकलावी. सदर कामे स्थानिक हवामान परिस्थिती व पावसाची उघडीप पाहुन करावी असे आवाहन राजेंद्र निकम,  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन