नीटच्या परिक्षेत साक्षी वीरचे घवघवीत यश
नीटच्या परिक्षेत साक्षी वीरचे घवघवीत यश
बीड ; दि.१७ (प्रतिनिधी)
बीड तालुक्यातील पाली येथील साक्षी सुभाष वीर हिने नीटच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. नीटच्या परिक्षेत तिला 537 गुण मिळाले आहेत.
कु.साक्षी वीर ही पाली येथील रहिवाशी असून , तीने मार्च 2018 ला चंपावती विद्यालय बीड येथून ssc परीक्षेत 96. 80 टक्के गुण घेऊन लातूर येथील राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथून HSC परीक्षेत 89 टक्के गुण घेतले व नीट 2020 या वैद्यकिय प्रवेश परीक्षेत 720 पैकी 537 गुण घेऊन उज्जवल यश संपादन केले . वडील सुभाष वीर हे प्राथमिक शिक्षक असून ते प्रा.शा. खंडाळा येथे कार्यरत आहेत . या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिच्या या यशा बद्दल श्री . गिते सर ,अनिल राऊत सर, श्री . आबासाहेब घायाळ, भिमराव वीर ,प्रकाश वीर, सचिन नवले, जोगदंड सर, आठवले सर, शिंदे सर, रघुनाथराव महामुनी साहेब, सचिन राऊत सर, फावडे सर, तोंडे सर, धापसे सर, प्रदिप चौरे सर यांनी अभिनंदन केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा