माजी मंञी जयदत्त क्षीरसागरां कडून अतिवृष्टी नुकसानीची पाहणी
माजी मंञी जयदत्त क्षीरसागर यांनी
केली अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी
बीड प्रतिनिधी:
परतीच्या पावसाने मराठवाड्यात खूप नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी बांधवाला आतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे. कापूस, तूर व बाजरी ही पिके सडून गेली आहेत. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना सर्व बाजूने मदत केली पाहिजे. त्यासाठी सरसकट नुकसान भरपाई दयावी अशी मागणी माजी मंञी जयदत्त क्षीरसागर यांनी केली.
बीड आणि शिरूर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी माजी मंञी जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांनी थेट शेतात जाऊन केली. त्या नंतर त्यांनी शेतक-यांशी संवाद साधला.
या वेळी बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले कीशेतकऱ्यांना सर्व बाजूने मदत केली पाहिजे. सरसकट नुकसान भरपाई दयावी, पंचनामे होत राहतील, शेतकऱ्यांना तातडीची मदत होणे गरजेचे आहे. परतीच्या पावसाने मराठवाड्यात खूप नुकसान झाले आहे. यामध्ये शेतकरी बांधवाला आतिवृष्टीचा खूप मोठा फटका बसलेला आहे. कापूस, तूर व बाजरी ही पिके सडून गेली आहेत. उसाचे पीक ही वादळी वाऱ्याने झोपले आहे. शेतकरी उध्वस्त झाला आहे. अशा गंभीर व भीषण काळात राज्य व केंद्र सरकारच्या तातडीच्या मदतीची गरज आहे. शेतीसाठी व मातीसाठी आता कटिबद्ध राहणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. यासाठी केंद्राने महाराष्ट्राशी दुजाभाव न करता मदत करणे गरजेचे आहे. शेतकरी जगला पाहिजे, शेतकरी वाचला पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली पाहिजे. सरकार हे मायबाप आहेत. शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे आहे. त्यासाठी सरकारने तो विश्वास सार्थ करून दाखविला पाहिजे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे
शेतक-यांच्या हितासाठी काम करत आहेत. ते शेतक-यांना भरीव मदत करतील असा विश्वास या वेळी माजी मंत्री जयदत्त (अण्णा) क्षीरसागर यांनी व्यक्त केला. दरम्यान जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी शेतक-यांसाठी दौरा केल्यामुळे शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा