देवडी गावकऱ्यांच्या प्रेमाने न्यायमूर्ती देशमुख गहिवरले...

देवडी गावकऱ्यांच्या प्रेमाने न्यायमूर्ती देशमुख गहिवरले...

गावच्या मातीचा सुगंध कधी विसरणार नाही, एक आवाज दिला लगेच धावून येऊ: न्या. दिलीप देशमुख

देशमुख बंधु म्हणजे प्रामाणिक माणसाचा कारखाना - राम कुलकर्णी


बीड  दि.१९ (प्रतिनिधी) –

माझ्या देवडी ग्रामस्थांचे प्रेम पाहून मी भारावून गेलो. गावचा आशीर्वाद आणि आई वडिलांची पुण्याई यामुळे जीवनात नेहमीच यश मिळाले. मागे वळून पाहताना केलेले कष्ट आणि आमच्यासाठी आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आज आनंद वाटतो. सामाजिक जाणीव ठेवून आम्ही काम करतो. गावासाठी जेवढ चांगलं काम करणे शक्य त्या साठी नेहमीच पुढे राहू. गावच्या मातीचा सुगंध कधी विसरणार नाही, एक आवाज दिला तर लगेच धावून येऊ असा विश्वास वडवणी
तालुक्यातील देवडी गावचे सुपुत्र जिल्हा न्यायाधीश श्री. दिलीप देशमुख यांनी देवडी येथील गावकऱ्यांच्या सत्काराला उत्तर देताना म्हटले. तर देशमुख बंधू खऱ्या अर्थाने प्रामाणिक माणसाचा कारखाना असून, सामाजिक जाणीव ठेवत न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी केलेलं कर्तुत्व उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी या वेळी केले.
देवडी गावचे भूमिपुत्र दिलीप देशमुख यांची वाशिमचे मुख्य जिल्हा न्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल व राम कुलकर्णी यांची प्रवक्तापदी नियुक्ती झाल्याबद्दल, मराठी पत्रकार परिषद आणि ग्रामस्थांच्यावतीने भव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच जालिंदर झाटे हे होते 
तर व्यासपीठावर गावचे जेष्ठ नागरिक माजी सरपंच माणिकराव देशमुख, भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी, मच्छिंद्र झाटे, सरपंच जालिंदर झाटे, पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे, विभागीय सचिव विशाल साळुंके, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा अध्यक्ष साहस आदोडे, कृषी अभ्यासक शाहीर सर, शेतीनिष्ठ शेतकरी कल्याण कुलकर्णी, प्रा.मगर सर, जिल्हा उपाध्यक्ष सय्यद शाकेर,विश्वास आगे, वडवणी तालुका अध्यक्ष विनायक जाधव, पत्रकार सतिश मुजमुले, धारूर तालूकाध्यक्ष महादेव देशमुख तालुका सचिव आतुल शिनगारे सह अन्य पत्रकारांची उपस्थिती होती.     

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला न्यायधीश देशमुख यांचं कोरोना प्रतिबंध सोशल डिस्टनस पाळत गावकऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केलं. राणुबाई देवी मंदिरात संपन्न झालेल्या या सत्कार समारंभाच्या सुरुवातीला ग्रामस्थांच्यावतीने देशमुख यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक भाषणात मच्छिंद्र झाटे म्हणाले की, 'आम्हाला देशमुख बंधुचा स्वाभिमान वाटतो. आमच्या गावातून नामांकित पत्रकार, न्यायाधीश असल्याचाही आनंद आहे'. या वेळी सत्काराला उत्तर देताना न्यायमूर्ती श्री. दिलीप देशमुख म्हणाले गावकऱ्यांचं प्रेम पाहून मी भारावून गेलो. गावचा आशीर्वाद आणि आई वडिलांची पुण्याई यामुळे जीवनात नेहमीच यश मिळाले .मागे वळून पाहताना केलेले कष्ट आणि आमच्यासाठी आई-वडिलांनी पाहिलेले स्वप्न साकार झाल्याचा आनंद वाटतो. सामाजिक जाणीव ठेवून आम्ही काम करतो. गावासाठी जेवढ चांगलं काम करणे शक्य त्या साठी नेहमीच पुढे राहू. भविष्यात गरज पडेल तेव्हा मला बोलवा मदतीला आल्याशिवाय राहणार नाही. याच कार्यक्रमात भाजपा प्रवक्ते  राम कुलकर्णी म्हणाले की, गाव खेड्यातले प्रेम वेगळ असतं.आपलं लेकरू मोठं झालं त्याचा गावकऱ्यांना आनंद असतो. देशमुख बंधू आदर्श कुटुंब असून न्यायव्यवस्थेत दिलीप देशमुख यांचं नाव आणि त्यांनी जोपासलेलं पावित्र्य उल्लेखनीय आहे.  एस. एम.देशमुख सारखे पत्रकार महाराष्ट्रात आमचे नेतृत्व करतात याचा आम्हाला अभिमान वाटतो. नि:स्वार्थ सामाजिक सेवा करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. भावाची निवड न्यायाधीशपदी झाल्यानंतर मोठा भाऊ त्यांचा सत्कार करतो? आजच्या कुटुंब व्यवस्थेत नोंद घेण्यासारख उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी पत्रकार परिषदेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख अनिल महाजन यांनी तर उपस्थित प्रमुख अतिथींचं आभार संपादक अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील जेष्ठ नागरिक नारायण झाटे, तुळशिराम राऊत, लक्ष्मण झाटे, बाबासाहेब झाटे, विश्वनाथ झाटे, गोरखनाथ पैठणे, परमेश्वर राऊत, परमेश्वर झाटे, गितेश आगे, बाबुराव झाटे सह गावांतील नागरिकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमा प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन