नाळवंडी सर्कलमधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी घेतली ना. अब्दुल सत्तार यांची भेट

नाळवंडी सर्कलमधील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी घेतली ना. अब्दुल सत्तार यांची भेट  

ढेकणमोहा दि.२० (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील नाळवंडी सर्कल मधील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे झालेल्या पिकांचे तत्काळ पंचनामे करण्यासाठी राज्याचे महसूल, ग्रामीण विकास, बंदरे, खारजमीन विकास, विशेष साहाय्य राज्यमंत्री मा. नामदार अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन त्यांनी संवाद साधला. याप्रसंगी माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर, राहुल रेखावर  (जिल्हाधिकारी बीड), कुंडलिक खांडे (शिवसेना जिल्हाप्रमुख बीड), अरुणा डाके (माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी नागेश शिंदे (माजी सरपंच ढेकनमोहा), नारायण देवकते (चेअरमन ढेकणमोहा), पंजाब काकडे, दिलीप शेळके, भास्कर देवकते, आशोक आखाडे सर, भागवत खाकरे आदींची यावेळी उपस्थिती होती. या भेटीप्रसंगी नामदार अब्दुल सत्तार यांनी तात्काळ शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आश्वासन दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन