रोषणाई करा , फराळ बनवा , पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका- उद्धव ठाकरे

रोषणाई करा , फराळ बनवा , पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका- उद्धव ठाकरे 

मुंबई दि.८(प्रतिनिधी):
 रोषणाई करा , फराळ बनवा , पण सार्वजनिक ठिकाणी फटाके वाजवू नका , असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नागरिकांना केलं आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. मला तुमच्यावर आणीबाणी लादायची नाही. राज्य सरकार फटाक्यांवर बंदीही घालू शकते. मात्र , बंदी आणि कायदे करुनच जीवन सुरु ठेवायचं का , याचा निर्णय नागरिकांनीच घ्यावा , असं उद्धव ठाकरे म्हणाले. पूर्वीच्या काळात फटाके वाजवण्यात गंमत होती. मात्र , अलीकडच्या काळात लोकसंख्या आणि प्रदूषण वाढले आहे. फटाक्यांच्या धुरामुळे प्रदूषण होऊन कोरोनाचा धोका वाढत असेल तर आपण फटाक्यांवर बंदीऐवजी स्वत: वर काही बंधने घालून घेऊ शकत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे . त्यामुळे आपण आतापर्यंत केलेली सगळी मेहनत वाया जाईल, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन