औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीत आशिष देशमुख यांना छावा जनक्रांती संघटनेचा जाहीर पाठींबा
औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीत आशिष देशमुख यांना छावा जनक्रांती संघटनेचा जाहीर पाठींबा
औरंगाबाद दि.27 (प्रतिनिधी):- औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची 2020 ची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होत आहे. अनेक उमेदवार आपल्या विजयाचा दावा करीत आहेत. आशिष अशोक देशमुख हे देखील मागील अनेक दिवसांपासून मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात फिरून मतदारांच्या गाठी, भेटी घेवून शिक्षक, युवक, युवती, बेरोजगार आदी पदवीधर मंडळींना आपलेसे करत आहेत. त्यांच्या विविध प्रश्नांची जाणीव त्यांना असल्यामुळे लोक त्यांच्याकडे प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता या भावनेने मतदान देण्याचे कबुल करत आहेत.
आशिष देशमुख यांचे सामाजिक कार्य, विविध संघटनांचा आणि चळवळीशी त्यांचा असलेला घनिष्ट संबंध आणि मराठवाड्यातील जनसंपर्क पाहून तसेच पदवीधर युवक, युवती, शिक्षक मंडळी, बेरोजगार मंडळी यांच्या प्रती असलेली तळमळ आणि त्यांच्यासाठी कार्य करण्याची उर्मी पाहून छावा जनक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक शरद पवार साहेब यांनी औरंगाबाद पदवीधर मतदार संघात छावा संघटनेच्यावतीने त्यांना निवडणूकीत जाहीर पाठींबा दिला आहे.
छावा जनक्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांना, सदस्यांना, कार्यकर्त्यांना त्यांनी आशिष अशोक देशमुख यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच सर्व पदवीधर मंडळींनी त्यांना त्यांच्या मत पत्रिकेवरील अनुक्रमांक 13 समोरील आशिष अशोक देशमुख या नावा समोरील रकान्यात प्रथम पसंती दर्शवावी असे आवाहन छावा जनक्रांती संघटनेच्यावतीने करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा