आष्टीत सलग तिस-या दिवशी बिबट्याचा थरार. बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू

आष्टीत सलग तिस-या दिवशी बिबट्याचा थरार 

बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एका महिलेचा मृत्यू

आष्टी दि.२९ (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यात बिबट्याचे हल्ले सुरुच असून, रविवारी (दि.29)सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा जीव गेला आहे. यापूर्वी सकाळीच, आष्टीतील बोराडे वस्तीवरील महिलेला बिबट्याने जखमी केले होते. त्या महिलेवर अहमदनगरमध्ये उपचार सुरू असतानाच, त्याच भागात आज सांयकाळी सहाच्या सुमारास पुन्हा एकदा बिबट्याने 55 वर्षीय महिलेवर हल्ला केला. यात त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सकाळी झालेल्या पारगांव जोगेश्वरी परिसरातच वनविभागाचे पथक असून सुध्दा ही दुसरी घटना घडली. त्यामुळे या परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
   आष्टी तालुक्यात गेल्या चार दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ सुरूच आहे. आज सकाळी शालन शहाजी भोसले (वय 61) या महिलेवर बोरोडे वस्ती परिसरात बिबट्याने हल्ला केला होता. पण, प्रसंगवधाने तिची बिबट्याच्या जबड्यातून सुटका झाली. याठिकाणी लगेचच वनविभागाने पथके पाठवून पिंजराही लावला. पण, आज सायंकाळी 6 च्या सुमारास याच परिसरातील सुरेखा निळकंठ बळे या महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून, मृतदेहावर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन राञी उशीरा त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन