तरुणीवर अॅसिड हल्ला प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार: गृहमंत्री अनिल देशमुख

तरुणीवर अॅसिड हल्ला प्रकरणाचा खटला 
फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार: गृहमंत्री अनिल देशमुख


मुंबई , दि . १५ - (प्रतिनिधी)
तरुणीवर अॅसिड हल्ला करून नंतर तिला जिवंत जाळण्याच्या बीडमधील घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली आहे . दोषींना कोणत्याही स्थितीत कडक शिक्षा व्हावी यासाठी ' फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यासंदर्भात सूचना केली असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली
   संपूर्ण राज्याला हादरून सोडणारी घडना बीड जिल्ह्यात घडली. नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही खळवळजनक घटना घडली. प्रियकरानं प्रेयसिला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळलं . उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या घटनेवरून राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दरम्यान महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी दुर्दैवी घटना आहे . ठाकरे सरकारच्या काळात महिला सुरक्षित नसल्याचे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. त्यामुळे आता राज्यातील महिला सुरक्षेसाठी तात्काळ कृती आराखडा बनवावा , अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज केली
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली आहे. ' फास्ट ट्रॅक कोर्टा'त खटला चालवण्यासंदर्भात त्यांनी सूचना दिल्या असून या प्रकरणी ते स्वतः लक्ष ठेवून आहेत . दरम्यान , पीडितेचा जबाब नोंद करून नेकनूर पोलीसांत गु.र.नं. 257/2020 , कलम 307 , 326 ( अ ) भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपी अविनाश रामकिसन राजुरे ( 25 , रा . शेळगाव , ता . देगलुर , जि . नांदेड ) यास अटक करण्यात आली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन