गणगेवाडी परिसरात बिबटया दिसला..!!
गणगेवाडी परिसरात बिबटया दिसला..!!
आष्टी दि.28( प्रतिनिधी):
मागील दोन दिवसा पासून जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात बिबट्याने थैमान घातले आहे. शिवाय त्याने अनेकांवर हरवले केले आहेत. या हल्ल्यात वाढ होत असताना आज संध्याकाळी ८:४५च्या दरम्यान गणगेवाडी येथील घाडगे वस्ती येथील
दादा घाडगे या शेतकऱ्यास बिबटया दिसला. त्यामुळे या ठिकाणच्या शेतक-यांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यामुळे तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहे. सुरडी, किन्ही येथील घटनेमध्ये अनुक्रमे एक राजकीय पदाधिकारी व बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. या घटना ताज्या असतानाच आज मंगळूर येथील माय लेकरावर बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये महिला जखमी झाली आहे. ही घटना होऊन काही तासातच गणगेवाडी येथील घाडगे वस्ती येथे संध्याकाळी ८:४५च्या दरम्यान दादा घाडगे या शेतकऱ्यास बिबटया दिसला. घाडगे यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत वस्तीवरील नागरिकांच्या मदतीने आरडाओरडा करत बिबट्याला पळवून लावले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहे.
नागरिकांनी बिबटया दिसताच पोलीस प्रशासन व वनविभागास कळवावे. बिबट्याला पळवून लावण्यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन फटाके वाजवावेत. सामाजिक माध्यमावर अफवा पसरवू नाहीत. जाणून बुजून अफवा पसरविण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे सलीम चाउस पोलीस निरीक्षक आष्टी यांनी म्हटले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा