बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी सतरा पथके स्थापन
बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी सतरा पथके स्थापन
बीड दि.२८(प्रतिनिधी) :- सुरुडी व किनी येथे मानवी हल्ला केलेल्या बिबट्यास शोधून जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या एकूण सतरा टीम स्थापन झालेल्या असून त्यामध्ये औरंगाबाद, अमरावती, नांदेड व इतर 1 अशा एकूण चार वन्यजीव व्यवस्थापनामध्ये तज्ञ असणाऱ्या टीमचा ही समावेश असून एकूण ८० कर्मचारी यात सक्रीय आहेत तसेच आजूबाजूच्या गावामध्ये या टीमद्वारे पेट्रोलिंग करून बिबट्याचा मागोवा घेण्याचे व सुरक्षितता बाळगण्यासाठी प्रबोधन करण्याचे काम सुरू असून, सहा पिंजरे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी लावले आहेत. उद्या आणखी दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. लवकरच यशस्वीपणे जेरबंद करू असा विश्वास वनविभागाने व्यक्त केला आहे
0000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा