कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम यांना मातृशोक
कृषीउत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव कदम यांना मातृशोक
बीड दि.८ (प्रतिनिधी): कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा श्री नारायणगड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री दिनकरराव कदम यांच्या मातोश्री श्रीमती शांताबाई बळवंतराव कदम यांचे आज दिनांक ८ नोव्हेंबर रोज रविवारी सकाळी ११.४५ वा वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय ७८ वर्षे होते. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष स्व. बळवंतरावजी कदम यांच्या त्या पत्नी होत्या. बळवंतराव कदम यांच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यात त्यांनी मोलाची साथ दिली. त्यांच्या पश्चात एक मुलगा सभापती दिनकरराव, आणि दोन मुली, जावयी, नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधी आज सायंकाळी ४.०० वा. त्यांच्या बलगुजार येथील शेतात होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा