...त्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू

...त्या तरूणीचा दुर्दैवी मृत्यू
बीड दि. १५ (प्रतिनिधी)-
 पुण्यात लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये रहात असलेली तरुणी दिवाळीसाठी गावी आली असता तरुणीच्या प्रियकराने तिच्यावर अॅसिड हल्ला करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न काल लक्ष्मी पुजनाच्या दिवशी केल्याची घटना घडली. या घटनेने संपुर्ण जिल्हा हादरून गेला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोल हल्ल्यात जळालेल्या तरुणीवर उपचार चालू असताना तिचा आज सकाळी मृत्यू झाला. 
या घटनेने राज्यात खळबळ उडाली असून फरार आरोपीच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत.   माणुसकीला आणि प्रेम या शब्दाला काळिमा फासणा-या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
     नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामधील शेळगाव येथील सावित्रा ( वय 22 ) ही गेल्या काही महिन्यांपासून अविनाश राजुरे या तरूणा सोबत पुण्यात रिलेशनशीप मध्ये रहात होती. दि . 13 नोव्हेंबर रोजी हे दोघे पुण्याहून गावी मोटारसायकलवर परतत होते मात्र प्रियकराने सावित्रा हिच्या अंगावर अॅसिड टाकून तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल लक्ष्मीपुजनाच्या दिवशी घडली . यातील प्रियकराने तिला बीड तालुक्यातील येळंबघाट शिवारातील एका खड्ड्यामध्ये फेकून दिले होते . जखमी अवस्थेतील तरूणीला काही लोकांनी पाहिल्यानंतर याची माहिती नेकनूर पोलिसांना कळविण्यात आली . पोलिसांनी घटनास्थळी येऊन तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले
पोलिसांनी घटना स्थळी येऊन तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारा दरम्यान तरूणीचा आज पहाटेच्या दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेची माहिती मुलीच्या घरच्या लोकांना झाल्यानंतर तिचे घरचे लोक आज सकाळी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. या प्रकरणी आरोपीविरोधात नेकनूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपी फरार असून त्याचा शोध पोलिस घेत आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन