भररस्त्यात प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा

भररस्त्यात प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा

बीड (प्रतिनिधी) : पुण्याहून गावी परतताना रस्त्यातच 22 वर्षीय प्रेयसीला अॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची हृदयद्रावक घटना बीड तालुक्यातील येळंब घाट परिसरात उघडकीस आली आहे . या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदरील पीडिता तब्बल 12 तास रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्यात तडफडत होती.
      नांदेड जिल्ह्यातील देगलुर तालुक्यातील शेळगाव येथील सावित्रा ( वय 22 ) असं पीडित तरूणीचं नाव आहे . ती शेळगावातीलच अविनाश राजुरे याच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती . दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास बीड तालुक्यातील येळंब ( घाट ) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा - केज हा मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर या तरुणाने रस्त्याच्या कडेला अगोदर तरुणीवर अॅसिड टाकले . हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही , काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले . तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के टक्के शरीर भाजले असून प्रकृती स्थिर आहे . काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या तरुणी दिसली . त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य ओळखून तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली . दुर्दैवी म्हणजे पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती . तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती.
घटनास्थळी पोलिसांनी जावून पंचनामा केला त्यानंतर जखमी तरुणीला स्वत: च्या गाडीतून नेकनूरला आणले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून नेकनूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. लक्ष्मण केंद्रे पुढील तपास घेत आहेत . मात्र , ऐन दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घडलेल्या या थरारक प्रकारामुळे माणूस जिवंत आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सहा शहरातील मिठाई दुकाने, हॉटेल, रेस्टॉरंट , सुशोभीकरणाचे साहीत्य विक्री करणारे व इतर सर्व प्रकारच्या दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी*

जयभवानीने दिले व्हेंटिलेटर !

इरफान खानची कँन्सरशी झुंज अपयशी, ५३ व्या वर्षी निधन