दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका! परीक्षाविना अन्य मार्ग काढण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी केली मागणी
दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नका! परीक्षाविना अन्य मार्ग काढण्याची विद्यार्थ्यांसह पालकांनी केली मागणी बीड दि.३१ (प्रतिनिधी) - दहावी व बारावी बोर्डच्या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये. नाहीतर विद्यार्थ्यांचे करिअर व उज्ज्वल भविष्याची शाश्वती द्यावी किंवा परीक्षेविना अन्य मार्ग काढावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. याविषयी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, १)यावर्षी दहावी व बारावी मध्ये असलेले विद्यार्थी कोरोना महामारी च्या लॉक डाऊनमुळे गेल्यावर्षी नववी व अकरावी वीच्या परीक्षा न देता शासन निर्णयानुसार दहावी आणि बारावीच्या वर्गात दाखल केलेले आहेत. यामुळे त्यांची गुणवत्ता शाळा व शिक्षकांसह त्यांना स्वतःलाही न्याहाळता आलेली नाही. २) परीक्षेविना पुढच्या वर्गात पाठविलेल्या या विद्यार्थ्यांना पुन्हा थातूरमातुर शिक्षणाच्या भरवशावर दहावी व बारावी बोर्ड सारखी महत्त्वाची परीक्षा देण्यास लावणे कितपत योग्य आहे ? ३) २२ मार्च ...