बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट*
*बीड शहरातून जाणाऱ्या रस्त्या संदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट*
*बिंदुसरा पुलाचे चौपदरीकरण आणि शहरातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची केली मागणी*
खा.प्रितमताईंच्या मागणीला नितीन गडकरी यांचा सकारात्मक प्रतिसाद
बीड.१६(प्रतिनिधी):-बीड शहरातून जाणाऱ्या अहमदनगर-बीड-परळी महामार्गाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.शहरातून जाणाऱ्या प्रमुख महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी नितीन गडकरी यांच्याशी चर्चा देखील केली आहे. बिंदुसरा नदीवरील पुलाचे चौपदरीकरण आणि शहरातून जाणारा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्याची मागणी त्यांनी गडकरी यांच्याकडे केली आहे.
भौगोलिक तसेच धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने बीड शहर हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे.बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी तसेच अंबाजोगाईसह लिंगायत धर्मियांचे तीर्थक्षेत्र असलेले मन्मथ स्वामी यांच्या कपिलधार देवस्थानला भेट देण्यासाठी येणारा प्रवासी वर्ग नगर-बीड-परळी या प्रमुख महामार्गाने प्रवास करतो.त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते.परंतु या प्रमुख रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते असून प्रवासी आणि बीड जिल्ह्यातील नागरीकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे.
यासंदर्भात खा.प्रितमताई मुंडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आहे.शहरातून जाणारा महामार्ग सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा तसेच या रस्त्याचे आणि बिंदुसरा नदीवरील पुलाचे चौपदरीकरण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खा.प्रितमताई मुंडे यांच्या मागणीची तातडीने दखल घेत मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि बीड जिल्ह्यातील रस्त्याच्या समस्या सोडविण्यासाठी विना विलंब शक्य तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
•••••
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा