बळजबरीने धर्मांतर करायला लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करा आंबेडकरी अनुयायांचे एसपीना निवेदन
बळजबरीने धर्मांतर करायला लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करा आंबेडकरी अनुयायांचे एसपीना निवेदन
- ख्रिश्चन धर्मांतर रोखण्यासाठी बीडमध्ये बुद्ध धम्म बचाव कृती समितीचा पुढाकार
बीड दि.४( प्रतिनिधी): बीड शहरातील आजू बाजूच्या मागासवर्गीय वस्त्यामधील गोरगरीब मागासवर्गीय कुंटुंबियांना पैशाचे आमीष दाखवुन, अंधद्धा पसरवुन त्यांना ख्रिश्चन धर्माकडे ओढण्याचा डाव बीड येथील आंबेडकरी अनुयायांनी रविवारी उधळून लावला. धर्मातर रोखण्यासाठी बीड येथे बुद्ध धम्म बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. सोमवारी शेकडो आंबेडकरी अनुयायांनी पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन
गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
बीड शहरातील पुरग्रस्त कॉलनी, म्हाडा कॉलनी, शिंदेनगर व इतर मागासवर्गीय वस्त्यामध्ये गरीब बौद्ध व मागासवर्गीय कुंटुंबांना पैशाचे आमीष दाखवुन, त्याना बळजबरीने ख्रिश्चन धर्म स्विकारण्यास भाग पाडले जात असल्याचे प्रकार घडत आहेत, रविवारी सकाळी आंबेडकरी अनुयायांना ही माहिती मिळाल्यानंतर, कार्यकर्त्यांनी या भागात जाऊन, मशिनर्याला चांगला जाब विचारला, ख्रिश्चन धर्मांतरांचे प्रकार बीडमध्ये खपवुन घेणार नाहीत, असा इशारा बुध्द धम्म बचाव कृती समितीने दिला आहे.
ख्रिश्चन धर्मांतरांचे असे प्रकार उघडकीस आल्यानंतर, बुद्ध धम्म बचाव समितीने बळजबरीने धर्म स्विकारण्यास भाग पाडणा-यावर
कारवाई करा या मागणीचे निवेदन सोमवारी बीडच्या जिल्हा पोलिस अधीक्षक आर.राजा यांना दिले. यावेळी प्रशांत वासनीक, राजू जोगंदड, रवि वाघमारे, अभय मगरे, प्रमोद शिंदे, सुमीत डोंगरे, केतन गायकवाड, गौतम कांबळे, अॅड. अविनाश गंडले, गोवर्धन पायाळ, विकास डोंगरे, अजय सरवदे, मनोज बोराडे, उमेश तुळवे, संजय मिसाळ, विलास ससाणे, कैलास वीर, संतोष जोगदंड, नितीन महुवाले आदिसह शेकडो अनुयायी उपस्थित होते.
---------
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा