पुणे जिल्हा ग्रामीण महिला पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष स्वाती मोराळे यांची निवड
पुणे जिल्हा ग्रामीण महिला पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष स्वाती मोराळे यांची निवड
पुणे दि.१० (प्रतिनिधी)
ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य जिल्हा कार्यकारणी संघटनेचे संस्थापक दत्तात्रय खेमनार यांनी जाहीर केली. ग्रामीण भागातील प्रश्न व विशेषतः महिलांचे प्रश्न यांना वाचा फोडण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण महिला पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी स्वाती मोलाचे यांची निवड करण्यात आल्याचे खेमनार यांनी सांगितले.
महिलावर होणारे अत्याचार, हुंडाबंदी, स्वावलंबन यावर आपण काम करणार असे स्वाती मोराळे यांनी सांगितले. महिलांचा राजकारण आणि समाजकारण यात सहभाग वाढला पाहिजे. समाजाचा अर्धा भाग स्त्रियांचा आहे त्याप्रमाणात प्रत्यक्ष सहभाग नाही त्यासाठी प्रयत्न करू.स्त्री कमजोर म्हणून नाही तर स्वावलंबी व निडर बनून बाहेर पडेल असा आत्मविश्वास मला वाटतो. यासाठी पत्रकार म्हणुन मी सतत महिलांची बाजू मांडेल.
पत्रकारांना मोफत व लवकर कोविड लस मिळावी. त्यांना मोफत रेल्वे व बस पास मिळावा. पत्रकारांना टोल माफ करावा. शासकीय विभागात पत्रकारांच्या जागा भराव्यात अशा विविध पत्रकारांच्या प्रश्नासाठी संघटनेच्या माध्यमातून वाचा फोडणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सर्व स्तरांतून दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करत त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा